इन्स्टाग्राम हे सध्या सगळ्याच तरुण पिढीचं लाडकं सोशल मीडिया अॅप झालं आहे. या अॅपवर येणारे फोटो, रिल्स पाहात पाहात अनेक लोक तास न् तास वाया घालवतात. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनीही याविषयी चिंता व्यक्त केली होती. अशात याच इन्स्टाग्राममुळे एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. पतीने पत्नीला इन्स्टा रिल बनवण्यापासून रोखलं. त्यामुळे पत्नीते तिच्या पतीची हत्या केली.
कुठे घडली ही धक्कादायक घटना?
बिहारमधल्या बेगुसराय या ठिकाणी ही घटना घडली आहे. महेश्वर राय असं या घटनेत मृत्यू झालेल्या माणसाचं नाव आहे. त्याची पत्नी राणी कुमारी पंडीतने तिच्या घरातल्यांसह मिळून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांनी महेश्वर कुमार रायचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणात महेश्वरच्या पत्नीला म्हणजेच राणी कुमारीला अटक केली आहे.
महेश्वरचे वडील काय म्हणाले?
मृत्यू झालेल्या महेश्वरचे वडील रामप्रवेश राय यांनी पोलिसांना सांगितलं की महेश्वस आणि राणी कुमारी यांचं लग्न सात वर्षांपूर्वी झालं होतं. महेश्वर हा कोलकाता या ठिकाणी मजुरीचं काम करत होता. काही दिवसांपूर्वीच तो घरी आला होता. मागच्या काही दिवसांपासून राणी कुमारी टीक टॉक आणि इन्स्टाग्रामवर रिल तयार करत होती. मात्र माझ्या मुलाला ते आवडत नव्हतं. मात्र हट्टी राणीने व्हिडीओ आणि रिल्स बनवणं सोडलं नाही.
रविवारी काय घडलं?
रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास महेश्वर त्याच्या सासरी गेला होता. त्यानंतर १०.३० च्या दरम्यान मला माझा दुसरा मुलगा रुदल याने फोन करुन सांगितलं की महेश्वर फोन उचलत नाही. त्यानंतर पुन्हा पुन्हा फोन केल्यावर दुसऱ्याच एका व्यक्तीने त्याचा फोन उचलला. त्यानंतर काहीतरी गडबड आहे असं लक्षात आलं. असंही महेश्वरच्या वडिलांनी सांगितलं आहे. त्यानंतर महेश्वरचे वडील रामेश्वर हे त्याच्या सासरी पोहचले. तिथे त्यांना महेश्वरचा मृतदेहच दिसला. पोलिसांना त्यांनी कळवलं होतं ज्यामुळे पोलीसही तिथे पोहचले. रामेश्वर राय यांनी हा आरोप केला आहे की टीकटॉक आणि इन्स्टाग्राम रिल न बनवू दिल्याने त्याच्या पत्नीने म्हणजेच राणी कुमारीने महेश्वरची हत्या केली.
इतकंच नाही तर महेश्वरच्या पत्नीचे अनैतिक संबंध आहेत असाही आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे. तसंच महेश्वरला रुग्णालयात नेतो असं सांगून काही जणांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी राणी कुमारीला अटक करण्यात आली आहे. आता पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. एनडीटीव्हीने याविषयीचं वृत्त दिलं आहे.