उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका २३ वर्षीय तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. सोनू आणि त्याच्या भावाने मिळून आपल्यावर बलात्कार केला असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

पीडित तरुणीची सोनूबरोबर फेसबुकवरुन ओळख झाली होती. आरोपी सोनूने आपल्याला हॉटेलमधल्या रुमवर ठेवले होते. आरोपीने बलात्काराचे चित्रीकरणही केले. सोनू लग्नासाठी जबरदस्ती करण्यासाठी या चित्रीकरणाचा वापर करत होता असे पीडित महिलेने म्हटले आहे.

सोनूने त्याचा धर्म सुद्धा आपल्यापासून लपवून ठेवला असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. शामलीचे पोलीस अधीक्षक अजय पांडे यांच्या आदेशावरुन सोनू आणि त्याच्या १० कुटुंबियांविरोधात दंड विधान संहितेच्या विविध कलमातंर्गत तक्रार दाखल केली आहे.

Story img Loader