Hyderabad Airport Bomb Threat: हैदराबादच्या रारजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका तरूणीने बॉम्ब शब्दाचा उल्लेख केला आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला. तरूणीची विमानतळावर तपासणी सुरू असताना मेटल डिटेक्टर यंत्राने आवाज केला. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी अधिक तपासणी करायची असल्याचे म्हटले. सुरक्षा रक्षकांनी खबरदारी घेतल्यामुळे सदर तरूणीने माझ्याकडे बॉम्ब आहे का? असा टोमणा मारला. मात्र तिच्या या मस्करीचा उलट परिणाम झाला आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली. एका जोकमुळे संपूर्ण विमानतळ काही काळ वेठीस धरले गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, एक २० वर्षीय तरूणी गोव्याला जाण्यासाठी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. विमानतळावर केंद्रीय सुरक्षा रक्षक दलाचे जवान तपासणी करत असताना सदर तरूणी मदत करत नव्हती. तसेच माझ्याकडे बॉम्ब असल्याप्रमाणे तुम्ही तपासणी का करत आहात? असाही प्रश्न तिने विचारला. बॉम्ब या शब्दाचा उल्लेख केल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आणि तात्काळ सदर तरूणीला बाजूला करण्यात आले.

हे वाचा >> “सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान

मेटल डिटेक्टरमुळे आणखी गोंधळ वाढला

तरूणीला बाजूला केल्यानंतर तिच्या सामानाची आणि तिची पुन्हा एकदा संपूर्ण तपासणी केली गेली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, मेटल डिटेक्टरने तरूणीच्या शरीराची तपासणी करत असताना तिच्या गुडघ्याजवल मेटल डिटेक्टर वारंवार वाजत होते. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती आणखी वाढली. बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले. तसेच सदर तरूणीच्या पालकांनाही विमानतळावर बोलावून घेण्यात आले.

मुलीचे पालक जेव्हा विमानतळावर आले, तेव्हा त्यांनी खरी परिस्थिती सांगितली. काही महिन्यांपूर्वी मुलीचा अपघात झाला होता. त्यामुळे तिच्या पायात लोखंडी सळी बसवली असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच त्यांनी तिचे वैद्यकीय कागदपत्रेही सादर केली. ज्यामध्ये तिच्या पायात लोखंडी सळी असल्याचे निष्पन्न झाले.

हे ही वाचा >> ‘सर्व हिंदू मोदी समर्थक नाहीत’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंचे विधान; देशात खलिस्तानी असल्याची दिली कबुली

u

या सर्व गोंधळानंतर सीआयएसएफने सदर मुलीला पोलिसांच्या स्वाधीन केले. विमानतळ पोलीस ठाण्याचे प्रमुख के. बालाराजू यांनी सांगितले की, सदर मुलीवर साधारण गुन्हा दाखल करून तिला सोडून दिले.

योगायोग म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळत आहेत. अनेक विमानांच्या उड्डाणाला यामुळे उशीर झालेला आहे. तर काही विमानांचे उ्डडाण रद्द केले गेले होते. केंद्र सरकारने या विषयाची गंभीर दखल घेतली असून अशा धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman bomb remark creates panic at hyderabad rajiv gandhi international airport kvg