Woman Cleaning Husband Bed : रुग्णालयात पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या गरोदर पत्नीला तो पलंग रुग्णालयाने स्वच्छ करायला लावला. ही घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. वरिष्ठ वैद्यकिय आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई रुग्णालयाच्या दोन कर्मचाऱ्यांवर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुठे घडली ही घटना?

पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीला रक्ताचे डाग पडलेला तो पलंग स्वच्छ करायला लावल्याची ही घटना मध्य प्रदेशातल्या दिंडोरी या ठिकाणी घडली आहे. डॉ. रमेश मारावी यांनी छोटीबाई ठाकूर (आया) आणि राजकुमारी मर्कर या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. कारण या दोघींनी एका गरोदर महिलेला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या रक्ताचे डाग असलेला पलंग स्वच्छ करायला ( Woman Cleaning Husband Bed ) लावला. या महिलेने नकार दिला तरीही जबरदस्तीने या महिलेला हे काम करायला भाग पाडलं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

नेमकी काय घटना घडली?

गरोदर महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. त्याच्यावर गदासराई या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात ही गरोदर महिला रक्ताचे डाग असलेला पलंग स्वच्छ करताना ( Woman Cleaning Husband Bed ) दिसते आहे. प्रायमरी हेल्थ सेंटर गदासराई या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर लोकांनी या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. एका गरोदर महिलेला हे करावं लागतं आहे म्हणून नेटकरी संतापले होते. हा प्रकार दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया आल्या. ज्यानंतर दोन महिला कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

या प्रकरणाचा ( Woman Cleaning Husband Bed ) व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयातल्या दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादातून धरमसिंग मारवी आणि त्यांची तीन मुलं शिवराज, रघुराज आणि रामराज या तिघांवर हल्ला करण्यात आला. या घटनेत शिवराज हा त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याचा मृत्यू जागेवरच झाला. मात्र तो गंभीर जखमी झाला असावा म्हणून त्याच्यासह तिघांनाही रुग्णालयात आणण्यात आलं. डॉक्टरांनी शिवराजला मृत घोषित केलं. यानंतर शिवराजचा मृतदेह रुग्णालयातील पलंगावरुन काढल्यानंतर तो पलंग त्याच्या गरोदर पत्नीला रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांनी स्वच्छ ( Woman Cleaning Husband Bed ) करायला लावला असा आरोप झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरलही झाला आहे. आम्ही या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे असं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman cleaning husband bed and blood stains after her husband death in hospital video viral scj