लग्न करण्यास नकार दिला म्हणून एका २६ वर्षीय महिलेने तिच्या प्रियकराचे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १ जुलै रोजी बिहारमधील सारण जिल्ह्यात ही घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे. तसेच तिच्याकडून रक्ताचे डाग असलेला चाकूदेखील जप्त करण्यात आला आहे. तर पीडित तरुणावर पाटणा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – रडून, हात जोडून दयेची याचना करणाऱ्या कुटुंबावर हल्ला? Video मुळे हिंदू- मुस्लिम वादाची ठिणगी पेटली, पाहा खरं काय

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी महिला आणि पीडित तरुण यांच्यात मागील दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. ते १ जुलै २०२४ रोजी छपरा येथील न्यायालयात नोंदणी पद्धतीने विवाह करणार होते. मात्र, ऐनवेळेवर तरुणाने लग्नास नकार दिला. त्यामुळे महिलेने रागाच्या भरात तरुणाचे गुप्तांग कापत त्याला जखमी केले.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, १ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास सारण जिल्ह्यातील एका खासगी नर्सिंग होम येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पीडित तरुणाला तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्याला पाटणा येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

हेही वचाा – अश्लील हावभाव, माता भगिनींवरुन शिवीगाळ अमरावतीतील Video व्हायरल; बदनामी मात्र यूपीची, खरं काय ते पाहा

दरम्यान, आरोपी महिला ही डॉक्टर असल्याचे सांगितले जात असून या घटनेनंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे. तिच्याकडे विचारपूर केली असता, प्रियकराने ऐनवेळेवर लग्नास नकार दिल्याने आपण रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबुली या महिलेने दिली आहे. तसेच आपण आधी त्याला गुंगींचे इंजेक्शन दिले, त्यानंतर त्यांचे गुप्तांग कापले, असंही तिने सांगितले. महत्त्वाचे म्हणजे दोन वर्ष प्रेमसंबंधात असताना दोनवेळा गर्भपात केला, अशी माहितीही तिने पोलिसांनी दिली आहे.