हैदराबाद : अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या खेळावेळी चेंगराचेंगरी झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच महिलेल्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. बुधवारी रात्री ही घटना घडली. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहात मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे महिलेच्या पतीने माध्यमांना सांगितले. चित्रपटगृह व्यवस्थापनाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती तसेच अभिनेता आणि चित्रपटातील इतर कलाकार येणार असल्याची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
‘पुष्पा-२’ चित्रपटादरम्यान चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू
अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहात मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे महिलेच्या पतीने माध्यमांना सांगितले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 05-12-2024 at 23:13 IST | © The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman dies in stampede during pushpa 2 movie zws