जखमांवर मलमपट्टी करणाऱ्या महिला डॉक्टरवर कैद्याने धारधार शस्त्राने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत महिला डॉक्टरचा मृत्यू झाला असून पाच पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. वंदना दास असं २३ वर्षीय महिला डॉक्टरचं नाव असून संदीप असं आरोपीचं नाव आहे. बुधवारी सकाळी तिरुवनंतपुरममधील कोट्टरकारा तालुक्यात ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – Video: “मणिपूर पेटलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी…”, संजय राऊतांची टीका; म्हणाले, “बजरंग बलीला निवडणुकीत उतरवून…”

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी संदीप शिक्षक असून बुधवारी सकाळी त्याचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीबरोबर भांडण झाले. या भांडणात संदीप जखमी झाला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, संदीपला कोट्टरकारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा – युजर्ससाठी आनंदाची बातमी! Twitter लवकरच आणणार ‘हे’ जबरदस्त फिचर

यावेळी डॉ. वंदना दास संदीपवर उपचार करत असतानाच त्याने धारधार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी पाच पोलीस कर्मचारीसुद्धा जखमी झाले. डॉ. वंदना दास यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या हल्ल्यानंतर तिरुवनंतपुरममधील डॉक्टरांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला असून आरोपी विरोधात कडक करावी, अशी मागणी डॉक्टरांच्या संघटनांनी केली आहे.