मध्य प्रदेशातील सागर शहरातील बसस्थानकावर एका महिलेला तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित तिघांनी लाथा घालत काठीने मारहाण केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित महिलेला फरपटत नेलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी तिघांना अटक केली आहे. पीडित महिला मानसिकदृष्ट्या विचलित होती, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Mumbai Local Train Shocking Video viral
मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात नशेबाज तरुणाचा धिंगाणा, महिलांसमोर थुंकला अन् हातवारे करुन…; पाहा धक्कादायक VIDEO
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?

हेही वाचा- दहावीच्या विद्यार्थिनीनं अकराव्या मजल्यावरून मारली उडी, उच्चभ्रू सोसायटीतील घटना

संबंधित व्हिडीओत पीडित महिलेला फरपटत नेल्याच दिसत आहे. तसेच काठीने मारहाण केली जात आहे. तिचं पाच महिन्यांचं नवजात बाळ जमिनीवर पडलेलं असतानाही आरोपींनी तिच्या तोंडावर लाथा मारल्या. यावेळी पीडित महिला हात जोडून आरोपींकडून विनवणी करत आहे, तरीही आरोपी तिला मारहाण करताना व्हिडीओत दिसत आहेत.

हेही वाचा- संतापजनक: लेकानं जन्मदात्या आईला रस्त्यावरून नेलं फरपटत, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

याप्रकरणी प्रवीण रायकवार (२६), विक्की यादव (२०) आणि राकेश प्रजापती (४०) यांना गोपाळगंज पोलिसांनी गुरुवारी अटक केली. याबाबतची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक लोकेश सिन्हा यांनी दिली. प्राथमिक तपासानुसार, ही घटना १२-१३ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. यावेळी पीडित महिला बसस्थानकावरील कॅन्टीनमधून दूध घेण्यासाठी गेली होती. यावेळी काहीतरी घडलं आणि कॅन्टीनमधील तीन जणांनी तिला मारहाण केली, असं पोलिसांनी सांगितले. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.

Story img Loader