दिल्लीतल्या नोएडा या भागात असलेल्या एका शॉपिंग मॉलजवळ एका २६ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. इतर दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. पाच जणांनी या महिलेवर बलात्कार केला. त्याचा व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करत होते अशीही माहिती समोर आली आहे.

३० डिसेंबरला FIR दाखल

पीडित महिलेला डिसेंबर महिन्यात त्रास दिला गेला होता. तिची छेड काढण्यात आली. त्यानंतर ३० डिसेंबरला महिलेने तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ३० डिसेंबरला या प्रकरणी FIR दाखल करण्यात आली. त्यानंतर आम्ही जो तपास करत होतो त्यात तिघांना अटक केली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

A case has also been filed by ED in the Religare case mumbai news
मुंबई: रेलिगेअर प्रकरणी ईडीकडूनही गुन्हा दाखल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Murder of petrol pump owner of Virar two accused arrested by crime branch team
विरारच्या पेट्रोलपंप मालकाची हत्या, गुन्हे शाखेच्या पथकाकडून दोन आरोपींना अटक
attempt made to derail kalindi express by placing lpgcylinder on tracks in kanpur
कालिंदी एक्स्प्रेसच्या घातपाताचा प्रयत्न; रेल्वे रुळांवर एलपीजी सिलिंडर, पेट्रोलची बाटली, काडेपेटी; मोठा अपघात टळला
pune police commissioner marathi news
उद्योजकांना धमकावल्यास पोलीस आयुक्तांकडून कडक कारवाईचा इशारा, आयटी कंपनीतील अधिकाऱ्याला धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Mumbai Crime News
Mumbai Crime : लिव्ह इन पार्टनरवर बलात्कार केल्याचा आरोप, सात अटींचा करार दाखवून मिळवला जामीन, मुंबईतली घटना
Mumbai cockroach coffee, case against hotel manager,
मुंबई : कॉफीमध्ये झुरळ सापडल्याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा
girl molested in nandurbar
Nandurbar Crime : नंदुरबारमध्ये शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून पाचवीतील मुलीचा विनयभंग; अश्लिल व्हिडीओ दाखवून…

काय आहेत आरोपींची नावं?

राजकुमार, आझाद आणि विकास या तीन संशयितांना आम्ही अटक केली आहे. दोन इतर संशयित रवी आणि मेहमी या दोघांचा शोध आम्ही घेत आहोत. लवकरच त्यांनाही अटक करु असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी हेदेखील सांगितलं आहे की ३० डिसेंबरला सेक्टर ३९ च्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली गेली होती. या सगळ्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

महिलेने जो जबाब नोंदवला आहे त्यानुसार,पाच जणांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तिचा व्हिडीओ तयार केला आणि तिला ब्लॅकमेल करत होते. या पाच जणांमधले दोघेजण स्थानिक नेत्याच्या जवळचे आहेत. त्या आधारेच ते या महिलेला ब्लॅकमेल करुन धमक्या देत होते असंही समजतं आहे. पीडितेने ३० डिसेंबर रोजी तक्रार नोंदवली त्यानंतर या प्रकरणातल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. आता पोलीस इतर दोघांचा शोध घेत आहेत.