उत्तर प्रदेशमधील मैनपुरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचा मोबाइलचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पतीला पत्नीकडून अमानवी वागणूक मिळाली आहे. पतीने मोबाइल काढून घेतल्यांतर संतापलेल्या पत्नीने पतीला जबर मारहाण करत विजेचा धक्का दिला. पत्नीचा मोबाइलचा वापर कमी करण्यासाठी पतीने हे कृत्य केले होते, मात्र त्याची त्याला जबर किमंत मोजावी लागली.
३३ वर्षीय महिलेने पतीला आधी जबर मारहाण केली. त्यानंतर त्याला खुर्चीला बांधून विजेचा धक्का दिला. दाम्पत्याच्या १४ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या पत्नीने त्यालाही मराहाण केली. पत्नीच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या पती प्रदीप सिंहवर आता सैफइ वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
मुलांना स्मार्ट बनवायचं आहे, पण त्यांचा स्क्रीन टाइम कसा कमी कराल? जाणून घ्या सोप्या टिप्स!
प्रदीप सिंह याचे २००७ साली बेबी यादव यांच्याशी लग्न झाले होते. मारहाणीनंतर दाखल केलेल्या तक्रारीत प्रदीप सिंह यांनी नमूद केले की, माझी पत्नी दिवसभर कुणाशीतरी फोनवर बोलत असते. मी यावर आक्षेप घेत तिच्या माहेरी याबाबत कळवले होते. तिच्या घरच्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी तिचा मोबाइल काढून घेतला. यानंतर संतापलेल्या पत्नीने मला आणि माझ्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. मागच्या आठवड्यात तिने मला जबर मारहाण केली. क्रिकेट बॅटने तिने माझ्यावर हल्ला केला. त्यामुळे माझ्या डोक्याला आणि शरीरावर जबर जखमा झाल्या आहेत. एवढ्यावरच न थांबता मला खुर्चीला बांधून विजेचा धक्काही दिला. माझ्या मुलाने मला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.
Eye Health Tips: जास्त वेळ स्क्रीन टाइम आहे? डोळ्यांच्या आरोग्यासाठी खा ‘हे’ पदार्थ
ज्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली, त्या किशनी पोलीस ठाण्याचे प्रमुख अनिल कुमार म्हणाले की, आम्ही भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), कलम ३२८ आणि कलम ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पत्नी सध्या फरार असून तिचा शोध सुरू आहे.