कर्नाटकमध्ये थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. ३७ वर्षीय महिलेचा राहत्या घरी चाकू भोसकून खून करण्यात आला आहे. ही महिला सरकारी कर्मचारी आहे. पती घरी नसताना हा खून करण्यात आला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतिमा असं खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. प्रतिमा या भूविज्ञान आणि खनिकर्म विभागात उपसंचालक म्हणून कार्यरत होत्या. प्रतिमा यांच्यावर हल्ला झाला तेव्हा पती मूळगावी तीर्थहल्ली येथे गेला होता, अशी माहिती पोलीसांनी दिली.

हेही वाचा : खळबळजनक! भर बैठकीत भाजपा नेत्याची निर्घृण हत्या, कुऱ्हाडीने वार करत शरीराचे केले तुकडे

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चालकानं प्रतिमाला घरी सोडलं. यानंतर प्रतिमाच्या भावानं तिच्याशी फोनवरून संपर्क साधला. पण, प्रतिमानं कुठलाही प्रतिसाद दिला नाही. म्हणून आज, रविवारी ( ५ नोव्हेंबर ) भाऊ घरी प्रतिमाची चौकशी करण्यासाठी आला होता. पण, त्याला प्रतिमा मृतावस्थेत आढळून आली.

हेही वाचा : मुलीने दार उघडताच दिसला आईचा छिन्नविछिन्न मृतदेह, दलित महिलेबरोबर नेमकं काय घडलं? अखिलेश यादवही हळहळले

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या खूनामागे प्रतिमाच्या संपर्कांतील लोक असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman government employee stabbed to death at bengaluru home ssa