कर्ज मंजूर करून देण्याच्या बदल्यात एका महिलेकडे बँक मॅनेजरने शरिरसुखाची मागणी केली. ज्यानंतर संतापलेल्या महिलेने या बँक मॅनेजरला धू धू धुतले. हातात एक दांडका घेऊन, त्यानंतर चपलेने, हाताने या बँक मॅनेजरला चोप दिला. ही घटना १५ ऑक्टोबरची आहे. या बँक मॅनेजरचे नाव काय आहे? हे अद्याप समजलेले नाही. तसेच या महिलेचेही नाव समजलेले नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

तसेच एएनआय या वृत्तसंस्थेनेही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. कर्नाटकतील दवाणागिरी या ठिकाणी झालेली ही घटना आहे. या घटनेत हा बँक मॅनेजर महिलेला विनवण्या करताना दिसतो आहे. मात्र त्याची कॉलर धरून ही महिला त्याला चोप देताना दिसते आहे. सुरुवातीला एका मोठ्या दंडुक्याने ती त्याला मारताना दिसते आहे. त्यानंतर थोबाडीत ठेवून देताना आणि त्यानंतर चपलेने मारताना दिसते आहे. बँकेच्या मॅनेजरने कर्ज मंजूर करण्याच्या मोबदल्यात शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या मागणीमुळे संतापलेल्या महिलेने तिचा उद्रेक दाखवून दिला आहे.

पाहा व्हिडिओ

 

Story img Loader