राष्ट्रीय जनता दल अर्थात आरजेडीचे नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महिला आरक्षणमध्ये अति मागास, मागास आणि दुसरा कोटाही दिला गेला पाहिजे. तसं झालं नाही तर महिला आरक्षणाच्या नावावर पावडर, लिपस्टिक लावणाऱ्या आणि बॉब कट केलेल्या महिलाच पुढे जातील असं वक्तव्य राजद नेते अब्दुल बारी सिद्दीकींनी केलं आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्दीकी यांनी लोकांना टीव्हीपासून दूर राहण्याचं केलं आवाहन

बिहारमध्ये भाषण करत असताना अब्दुल बारी सिद्दीकी म्हणाले, टीव्ही आणि सोशल मीडियापासून दूर राहा. या सगळ्यामध्ये पडाल तर तुमची प्रतिष्ठा वाढणार नाही किंवा तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही. निवडणूक होईपर्यंत तरी टीव्ही पाहू नका. जे काही समाजवादी आहेत त्यांनी शपथ घ्यावी की लोकसभा निवडणूक होईपर्यंत आम्ही टीव्ही पाहणार नाही, टीव्हीवर बहिष्कार घालू. त्यामुळे काही फरक पडणार नाही. आपण सगळ्यांनी राम मनोहर लोहियांनी सांगितलेल्या मार्गावर चाललं पाहिजे असंही आवाहन त्यांनी केलं.

मुजफ्फरपूर भाजपा आमदार जनक सिंह यांनी महिला आरक्षण प्रकरणी सिद्दीकी यांनी जे वक्तव्य केलं त्यावर टीका केली आहे. एवढंच नाही तर मी आता सिद्दीकींना कोर्टात खेचणार असल्यांही म्हटलं आहे. सिद्दीकींसारखे लोक नेते कसे काय होतात? अशा मानसिकतेचे लोक महिलांना पुढे जाताना पाहू शकत नाहीत. खालच्या पातळीचं राजकारण करतात. एकदा धनुष्यातून बाण सुटला की सुटला. अब्दुल सिद्दीकी यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर आता त्यांनी माफी मागितली पाहिजे. आजतकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. निखिल आनंद यांनीही सिद्दीकी यांच्यावर टीका केली आहे. सिद्दीकी तेच नेते आहेत जे मुलाला सांगत होते की विदेशात गेला आहेस तर तिकडेच राहा भारतात येऊ नको. त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवणार?

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman in lipstick bob cut hair know what rjd leader abdul bari siddiqui says on women reservation scj