Accident : बसने प्रवास करताना बऱ्याचदा लोक खिडकीतून हात किंवा डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण असे करणे तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. एका महिला प्रवाशाबरोबर असाच प्रकार घडला आहे. बसने प्रवास करत असताना महिलेने उलटी करण्यासाठी खिडकीतून डोके बाहेर काढलं असताना तिला टँकर लॉरीने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी कर्नाटक येथे घडला. ही महिला म्हैसूरहून गुंडलुपेट येथे जात होती.

नेमकं काय झालं?

चामराजनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसूरहून गुंडलुपेटला जाणाऱ्या एका महिला प्रवाशाने उलटी करण्यासाठी खिडकीतून डोके बाहेर काढले. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका टँकर लॉरीची तिच्या डोक्याला धडक बसली. महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. म्हैसूर शहरी विभागातील डिव्हीजन कंट्रोलर, डीएमई, डीटीओ आणि एसओ यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी घटनास्थळाला भेट दिली.

Accident
Accident : बोगद्यात अपघात, BMW चा चक्काचूर, मदतीसाठी अर्धा तास याचना, पण…; भयंकर अपघातातून वाचलेल्या महिलेचा थरारक अनुभव
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Sadhvi Pragya Sing Thakur
Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा यांनी पोस्ट केला सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो; म्हणाल्या, “मी जगले वाचले तर काँग्रेसच्या टॉर्चरविरोधात…”
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
A viral Kannada post about Bengaluru being closed to outsiders sparks intense online debate.
“…तर उत्तर भारतीयांसाठी बंगळुरू बंद”, सोशल मीडिया पोस्टमुळे मोठा वाद; नेमकं प्रकरण काय?

हैद्राबादमध्ये एका भारधाव कारने कारने फुटपाथवर राहणाऱ्या काही जणांना उडवल्याची घटना घडल्याच्या काही तासांमध्येच ही दुर्घटना समोर आली आहे. शनिवारी पहाटे बसवतारकम इंडो-अमेरिकन कॅन्सर हॉस्पिटलजवळ फूटपाथवर झोपलेले असताना भरधाव कारने काही जणांना चिरडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.

तेलंगणा टुडेने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना पहाटे ४ वाजता घडली. बंजारा हिल्स पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे. सध्या कार चालक फरार असून जखमी झालेल्या लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.

तपासाचा भाग म्हणून पोलीस अपघात झाला त्या परिसरातील ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, जेणेकरून तपासात त्याचा उपयोग होईल.

२०२२ मध्ये देखील स्कूल बसच्या खिडकीतून बाहेर डोके काढल्याने चौथीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला होता. खिडकीतून बाहेर डोके काढलेल्या मुलाला एका पोलची धडक बसली होती, हा अपघात गाझीयाबाद शहरातील मोदीनगर येथे झाला होता. या १० वर्षीय मुलाचे नाव अनुराग भारद्वाज होते तो सुरत शहरातील मोदीनगर येथील रहिवासी होता. दुर्घटना घडल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याला झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्याचा जीव वाचला नाही.

Story img Loader