Woman Killed Husband : एका व्यावसायिकाचा मृतदेह पोलिसांना अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. या व्यावसायिकाची हत्या कुणी केली असेल? याचा शोध पोलीस घेत होते. या प्रकरणात पोलिसांनी व्यावसायिकाच्या दुसऱ्या पत्नीला आणि आणखी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचं गूढ पोलिसांनी उकललं आहे.

कुठे घडली आहे ही घटना?

तेलंगणाच्या व्यावसायिकाचा मृतदेह पोलिसांना कोडागु जिल्ह्यात सापडला होता. कर्नाटक पोलिसांनी हे गूढ उकललं आहे. या व्यावसायिकाच्या दुसऱ्या पत्नीने व्यावसायिकाची आठ कोटींची मालमत्ता हडप करण्यासाठी त्याला ठार ( Woman Killed Husband ) केलं. त्यानंतर त्याचा मृतदेह ती ८४० किमी लांब घेऊन गेली. मात्र पोलिसांनी हे गूढ उकललंच.

sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
blind couple stays with son's body
Blind Couple: मुलाचा घरात दुर्दैवी मृत्यू; अंध आई-वडील उपाशीपोटी चार दिवस घरातच पडून, हृदय पिळवटून टाकणारी घटना

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ ऑक्टोबरला पोलिसांना एक कोडागू या ठिकाणी असलेल्या कॉफी इस्टेट भागात एक अर्धवट जळालेला मृतदेह ( Woman Killed Husband ) आढळून आला. पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा मृतदेह ५४ वर्षीय रमेश नावाच्या व्यक्तीचा असल्याचं आणि रमेश व्यावसायिक असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी या खुनाचा माग काढत रमेशची दुसरी पत्नी निहारीका आणि तिचे साथीदार डॉ. निखिल राणा आणि अंकुर राणा या दोघांना अटक केली. हे तिघंही बंगळुरुमध्ये वास्तव्य करतात. या तिघांनाही अटक करण्यात आली. ज्यानंतर या हत्येमागचा उद्देश पोलिसांना समजला.

हे पण वाचा- बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल आरोपींच्या संपर्कात, मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता

मृतदेह मिळाल्यानंतर काय घडलं?

पोलिसांना कॉफी इस्टेट या ठिकाणी मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी चार पथकं तयार केली. ही चार पथकं मृतदेह ( Woman Killed Husband ) कुणाचा आहे? हत्या कशी झाली? कुणी केली? याची उत्तरं शोधत होती. तसंच पोलिसांनी यासाठी सीसीटीव्ही फुटेजही मोठ्या प्रमाणावर तपासलं. हजारो कार या मदीकेरी, सुनीतीकेप्पा, कुशलनगर आणि माधपूर या ठिकाणी जाताना दिसत होत्या. संशयितांना शोधण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडलं होतं. यानंतर पोलिसांना समजलं की ज्या रमेशचा मृतदेह आहे त्याच्या नावावर लाल रंगाची बेंझ कार होती आणि तो बेपत्ता आहे. पोलिसांनी मग त्याची इतर माहितीही मिळवली. ज्यानंतर पोलिसांना समजलं की निहारीका नावाची रमेशची दुसरी पत्नी आहे. त्यानंतर पोलिसांना त्यांच्या तपासाची सूत्रं निहारीकाच्या दिशेने वळवली. त्यानंतर पोलिसांनी निहारीका आणि तिचे दोन साथीदार डॉ. निखिल आणि अंकुर राणा या दोघांना अटक केली.

निहारीकाने पतीला कसं ठार केलं?

निहारीका ही २९ वर्षांची विवाहिता आहे. ती १६ वर्षांची होती तेव्हा तिचे वडील वारले. तिच्या आईने दुसरं लग्न केलं. त्यानंतर निहारीकाचंही लग्न झालं. तिला मूलही झालं. मात्र तिच्या लग्नात अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यानंतर तिने घटस्फोट घेतला. निहारीकाने इंजिनिअरींग केलं होतं, तसंच विविध कंपन्यांमध्ये तिने नोकरी. तिला चांगला पगार मिळू लागला होता असंही पोलिसांनी सांगितलं. निहारिकाने अंकुरच्या मदतीने रमेशची हत्या करण्याचा निर्णय घेतला. १ ऑक्टोबरला निहारीकाने तिच्या पतीची हत्या ( Woman Killed Husband ) केली. तिने त्याचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घेऊन तिने ८४० किमीचा प्रवास केला आणि त्याचा मृतदेह कॉफी इस्टेटमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. आता पोलिसांनी निहारीकाल आणि इतर दोघांना अटक केली आहे. पतीची ८ कोटींची मालमत्ता हडप करण्यासाठी तिने हे सगळं केलं अशी माहिती समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

Story img Loader