काही दिवसांपूर्वीच कोलकाता येथील आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत आंदोलन केलं होतं. एकंदरित नागरिकांचा रोष बघता पश्चिम बंगाल सरकारला बलात्कार विरोधी कायदा पारित करणं भाग पडलं. ही घटना ताजी असताना आता कोलकाता येथे महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाता येथीलपंचतारांकीत हॉटेलमध्ये महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारासही घटना घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे एकीकडे पश्चिम बंगालच्या विधानसभेत बलात्कार विरोधी कायदा पारित होत असताना दुसरीकडे ही घटना घडल्याने नागरिकांनाकडून संताप व्यक्त होतो आहे. दरम्यान, याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा – Howrah Hospital : पश्चिम बंगालच्या रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार, सीटीस्कॅन केंद्रात अल्पवयीन मुलीचा कर्मचाऱ्याकडून विनयभंग!

कोलकाता येथील आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील घटनेनंतर अजूनही नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या सरकारने महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसंच लैंगिक अत्याचार, शोषण आणि बलात्काराच्या घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नवं विधेयक पारित केलं आहे. या कायद्यानुसार, बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास आरोपीला फाशी शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा – President Droupadi Murmu : “बस आता खूप झालं”, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची संतप्त प्रतिक्रिया; ‘या’ मुद्द्यावर केलं भाष्य!

याशिवाय बलात्कार प्रकरणाचा तपास अहवाल २१ दिवसांच्या आत आला पाहिजे अशीही तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे. जर २१ दिवसांत तपास पूर्ण झाला नाही तर तपास पूर्ण करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतच वाढवून मिळणार आहे. या १५ दिवसांच्या कालावधीत जो तपास केला जाईल तो पोलीस अधीक्षक आणि त्यावरच्या पदावरचे अधिकारी यांच्या नेतृत्वातच केला जाईल. अशा तरतुदी या विधेयकात करण्यात आल्या आहेत.