मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात हत्येची घटना उघडीस आली आहे. या घटनेचा तपास स्वतः जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी केला आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नी कृष्णा बाई पतीची मारेकरी असल्याचे तपासात समोर आले आहे. तिने प्रियकर शुभम याच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. पत्नीने पतीचे दोन्ही हात धरले आणि प्रियकराने कुऱ्हाडीने वार करत त्याला ठार केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदिशाचे पोलीस अधीक्षक विनायक वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदिशाच्या लाटेरी तहसीलच्या मलिया खेडी गावात ही घटना घडली. नवविवाहित जोडपं झोपले होते. त्यावेळी पतीची हत्या करण्यात आली. पत्नी आधी आपण बेशुद्ध पडल्याचे सांगत होती. मात्र, पोलिसांना पहिल्या दिवसापासून पत्नीवर संशय होता. आता पोलिसांनी याचा खुलासा केला आहे.

पोलिसांनी दोघांना अटक केली आहे

लग्नाच्या १५ दिवसानंतर नवविवाहित महिलेने पतीची निर्घृण हत्या केली आहे. महिला एक दिवस आधी आपल्या सासरच्या घरी आली होती. पत्नीने तिच्या ४ वर्षांच्या प्रेमसंबंधामुळे प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या पतीची हत्या केली. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा- लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करुन किचनमध्ये पुरला मृतदेह; असा झाला खुलासा

गुगल मॅपची मदत घेत प्रियकराने गाठले प्रेयसीचे घर

पत्नीने तिच्या प्रियकराला फोन करुन बोलावले होते. त्यावर प्रियकर मोटारसायकलमध्ये बाराशे रुपयाचे पेट्रोल टाकून आणि कुऱ्हाड बांधून हत्या करण्यासाठी गावात आला होता. गुगल मॅपची मदत घेत प्रियकराने प्रेयसीचे घर गाठले. त्यानंतर दोघांनी मिळून ही घटना घडवून आणली.