Girl Sell For Loan Settlement andhra pradesh : माय मरो पण मावशी जगो, अशी आपल्याकडे म्हण आहे. आईपेक्षा मावशी लेकराला जास्त जीव लावते. पण याच नात्याला काळिमा फासणारी घटना आंध्र प्रदेश येथे घडली आहे. केवळ ३५ हजारांच्या कर्जच्या सेटलमेंटसाठी एका मावशीने आपल्या ११ वर्षीय भाचीला विकलं असल्याचा (Girl Sell For Loan Settlement) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातल फ्री प्रेस जर्नलने वृत्त दिलं आहे.

कर्नाटकातील तुमकूर येथे राहणाऱ्या पीडित मुलीला तिच्या आईने तिच्या आंध्र प्रदेशातील हिंदूपूर येथे तिच्या मावशीकडे सुट्टीसाठी पाठवलं होतं. या मावशीवर कर्ज होतं. या कर्जाची सेटलमेंट करण्याकरता जामीनदार तिच्याकडे तगादा लावत होता. त्यामुळे तिने तिच्या ११ वर्षीय भाचीला अवघ्या ३५ हजारांच्या सेटलमेंटसाठी विकले. सुट्टी संपल्यानंतर तिची आई तिला आंध्र प्रदेश येथे आणायला गेली. परंतु, जामीनदाराने तिला परत पाठवण्यास नकार दिला. (Girl Sell For Loan Settlement)

Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
Isha Koppikar first reaction on divorce with Timmy Narang
१४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”

कर्ज फेड आणि मुलीला घेऊन जा

जामीनदाराकडे तिच्या मुलीला पाहून आईला धक्का बसला. या जामीनदाराच्या घरी मुलगी बदके चारायला गेली होती. आईने मुलीला घेऊन जाण्याची विनंती केली असता जमीनदाराने मुलीला सोडलं नाही. कर्ज फेड आणि मुलीला घेऊन जा, असं तो म्हणाला. आईच्या विनवणीनंतरही त्याने तिला सोडलं नाही. त्यामुळे, अखेर आईने यासंदर्भात कामगार अधिकाऱ्याकडे तक्रार केली. त्यानंतर आईने जिल्हा कामगार अधिकारी के. तेजवती यांच्याकडे तक्रार केली. शहर पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घातल्यानंतर या मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली.

हेही वाचा >> धक्कादायक! शाळेतील मित्रांकडूनच आठ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; श्वान पथकाने आरोपींचा ‘असा’ काढला माग

१० जुलै रोजी मुलीला सुरक्षितपणे तुमकुरू येथे परत आणण्यात आले. याप्रकरणी मुलीची मावशी सुजाता, तिचा पती शंकर आणि जमीनदाराविरोधात भादंविच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

आंध्र प्रदेशमध्ये गुन्हेगारी वाढली?

गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेश येथे अनेक गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना घडत आहे. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातील एका शाळकरी मुलीवर तिच्यात शाळेतील मुलांनी बलात्कार केला. या घटनेमुळेही आंध्र प्रदेशमध्ये खळबळ माजली आहे. केवळ आत्महत्या करून ही मुलं थांबली नाहीत, तर तिची हत्याही केली. तिचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही. एका पाण्याच्या प्रवाहात तिचा मृतदेह फेकून देण्यात आला आहे. पोलिसांच्या श्वान पथकाच्या मदतीने पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आहेत.