महेंद्रसिंह मनराल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण दिल्लीतील एका फार्महाऊसवर नव्या वर्षांची पार्टी सुरू असताना एका ४२ वर्षीय महिलेच्या डोक्यात गोळी घालण्यात आली असल्याचा प्रकार घडला आहे. फार्महाऊसचा मालक राजू सिंह हा असून तो बिहारमधील माजी आमदार आहे.

ही महिला व्यवसायाने वास्तुस्थापत्यतज्ज्ञ असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस राजू सिंह याचा शोध घेत असून तो फरार आहे, असे विशेष पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आर. पी. उपाध्याय यांनी सांगितले.

राजू सिंह याचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. राजू सिंह हा दोन भाऊ आणि कुटुंबीयांसमवेत सदर फार्महाऊसमध्ये राहतो. सिंह आणि अन्य काही जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे या आरोपांखाली एफआयआर नोंदविण्यात आला आहे.