Heart Attack : माणसाचं आयुष्य हे किती अनिश्चित आहे, असतं याचं एक उदाहरण समोर आलं आहे. हृदय विकाराचा झटका आल्यानंतर वेळीच उपचार मिळाले नाहीत तर माणसाचा मृत्यू होतो. अशीच एक घटना समोर आली आहे. एक महिला देशभक्तीचं गाणं म्हणत होती. ती गात असतानाच तिला हृदयविकाराचा झटका ( Heart Attack ) आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. गुजरातच्या भुज भागातली ही घटना आहे. गाणं म्हणत असताना या महिलेला हृदयविकाराचा झटका आला. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत ( Heart Attack ) जाहीर केलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आरती राठौड असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.
नेमकी ही काय घटना आहे?
गुजरातमधल्या भुज या ठिकाणी प्रमुचस्वागी वृक्ष मित्र संस्थेद्वारे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आरती राठौड नावाच्या एक महिला देशभक्तीचं गाणं म्हणत होत्या. त्या खुर्चीवर बसूनच गाणं म्हणत होत्या. त्यावेळी अचानक त्या खाली कोसळल्या. ज्यानंतर त्यांना काय झालं असं लोकांना वाटलं म्हणून आरती राठौड यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत ( Heart Attack ) जाहीर केलं.
हे पण वाचा- विक्रोळी येथे तरण तलावात तरुणाचा मृतदेह सापडला ; पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल
व्हायरल व्हिडीओत काय दिसतं आहे?
आरती राठौड या खुर्चीवर बसून गाणं म्हणत असल्याचं दिसतं आहे. कार्यक्रमात बरेच लोक उपस्थित होते. ते मोबाइलवरुन आरती राठौड या म्हणत असलेल्या गाण्याचा व्हिडीओ चित्रित करत होते. तितक्यात त्या खुर्चीवरुन खाली कोसळल्या. ज्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आज तकने हे वृत्त दिलं आहे.
करोनाच्या साथीनंतर वाढलं हृदयविकाराचं, झटक्यांचं प्रमाण
करोनानंतर बदल झालेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका ( Heart Attack ) येऊन मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. लोकांची बैठी जीवनशैली, वर्क फ्रॉम होम, कामाच्या अनियमित वेळा, ताण तणावाच्या प्रमाणात झालेली वाढ, खाण्या पिण्याच्या बदललेल्या सवयी या सगळ्यामुळे हे प्रमाण वाढलेलं दिसून येतं आहे असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे. अशात ही घटना लोकांची हळहळ वाढवणारी ठरली आहे. राठौड यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसंच आरती राठौड यांचा व्हिडीओ पाहूनही लोक हळहळ व्यक्त करत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd