दिल्लीत एका 33 वर्षीय महिलेने तिच्या प्रियकरावर 14 वेळा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप करत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दक्षिणपूर्व दिल्लीतील जैतपूर परिसरात ही घटना घडली असून पोलिसांकडून आरोपीला अटक केली आहे.

दक्षिणपूर्व दिल्लीतील जैतपूर परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेचे एका सॉफ्टवेअर अभियंत्यासोबत प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातूनच ती १४ वेळा गर्भवती राहिती. मात्र, प्रत्येकवेळी त्याने तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. अखेर त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला एम्समध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेचा मोबाईल आणि सुसाईट नोट जप्त केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader