पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशय असल्याने महिलेने पाच गुंडांना महिलेवर सामूहिक बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार महिलेने आरोपींना मोबाइलमध्ये रेकॉर्डदेखील करायला सांगितला होता अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे. हैदराबादमधील कोंडापूर येथील श्रीरामनगर कॉलनीत २६ मे रोजी ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गायत्रीने पतीचे विवाहबाह्य संबंध असणाऱ्या महिलेला धडा शिकवण्यासाठी हा कट आखला होता. सायबर पोलिसांनी सांगितलं की, युपीएससी परीक्षेची तयारी करत असताना गायत्रीचा पती श्रीकांत आणि पीडितेची ओळख आली. पीडित महिला अनेकदा त्यांच्या घरी येत असे. ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात ती त्यांच्याकडे वास्तव्याला होती.

Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल

मात्र आपला पती आणि पीडितेमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय गायत्रीला आला आणि तेथून परिस्थिती बिघडली. गायत्रीसोबत वारंवार भांडण होत असल्याने पीडितेने अखेर ते घर सोडलं.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, २६ मे रोजी गायत्रीने आपल्याला घऱी बोलावलं. तिथे पोहोचल्याने भाड्याने बोलावलेल्या पाच गुडांनी आपल्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपींनी सगळा प्रकार रेकॉर्ड केला आणि पोलिसांकडे गेल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.

पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी गायत्रीसोबत सहा जणांना अटक केली आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे.

Story img Loader