मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेते शाहरूख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून वाद सुरू आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने भगव्या रंगांची बिकिनी परिधान केली आहे. यावर काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनीही या गाण्याला विरोध केला असून ‘पठाण’ चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
भगव्या बिकिनीच्या वादानंतर सोशल मीडियात एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संबंधित महिला भगव्या रंगाचं आइसक्रीम खाताना दिसत आहे. भगव्या रंगावर भारतीय जनता पार्टीचा ‘कॉपीराइट’ आहे का? असा सवालही संबंधित महिला व्हिडीओमध्ये विचारत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
हेही वाचा- “भगव्या रंगाचा लंगोट चालतो मग…” मराठमोळी स्मिता गोंदकर स्पष्टच बोलली
भाजपा नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून हा व्हिडीओ आतापर्यंत दहा लाखाहून अधिकजणांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हिडीओमधील महिला नेमकी कोण आहे? तिचा कोणत्या क्षेत्राशी संबंध आहे? याबाबतची माहिती मिळू शकली नाही.
हेही वाचा- अमेरिकन पॉर्नस्टारचा ‘पठाण’ मधील गाण्यावर बोल्ड डान्स; व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओत संबंधित महिला भाजपाला आव्हान देताना दिसत आहे. “भगव्या रंगावर कुणाचा कॉपीराइट आहे का? हे मला दाखवून द्यायचं आहे. भगव्या रंगावर भाजपाचा कॉपीराइट आहे का? हे माझं आइसस्क्रीम आहे, मी चाटणारच…” असं संबंधित महिला व्हिडीओत बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.