पैशांसाठी विवाहित महिलेनेचे आपल्या प्रियकराचे अपहरण घडवून आणल्याची धक्कादायक घटना चेन्नईतील वादापालानी येथे घडली आहे. या प्रकरणी महिला आणि सहा जणांना अटक करण्यात आली आहे. थिरुलोरचंद, राजेश कुमार दास, बिट्टू कुमार, जलालुद्दीन, राजेंद्रन, सर्वानन आणि जोश्ना अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीने अभिजीत दास यांचे अपहरण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने ४० हजार रुपये उकळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही रक्कम पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. पश्चिम बंगालचे असणारे अभिजीत दास बहुमजली इमारती उभ्या करणाऱ्या एका बांधकाम कंपनीत नोकरीला आहेत. कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या अभिजीत दास यांच्यावर कर्मचाऱ्यांना दर आठवडयाला पगार देण्याची जबाबदारी होती. अभिजीत दास आणि जोश्ना यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते अशी माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास अभिजीत दास साईटवर आले. ते जोश्नासोबत रुममध्ये असताना सहा जण तिथे आले. त्यातल्या एकाने मी जोश्नाचा पती आहे असे सांगून त्यांना धमकावले व शिवीगाळ केली. नंतर त्या सहाजणांनी अभिजीत दास यांना रिक्षामध्ये कोंबले व तिथून निघून गेले.

साईटवर हजर असलेल्या अन्य मजुरांनी हा प्रकार पाहिला व पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर वेगाने सूत्रे हलली व काही तासांच्या आत आरोपींना शोधून काढले. मंगळवारी सकाळी अभिजीत दास यांची सुटका झाली. जोश्नाने अभिजीत दास यांना मोठया रक्कमेचे व्यवहार हाताळताना पाहिले होते. त्यांच्याजवळ नेहमीच पैसा असतो हे तिला माहिती होते. म्हणून तिनेच अपहरणाचा कट रचला असे तपासकर्त्यांनी सांगितले.