अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर महिलांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे तालिबानकडून सांगण्यात आले होते. मात्र, एका वर्षानंतर अफगाणिस्तानमध्ये या उलट परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये वाढ झाली असून भोर प्रांतात एका महिलेने तालिबान्यांच्या धाकामुळे आत्महत्या केल्याचं पुढे आलं आहे.
हेही वाचा – Video: सेल्फी घेणाऱ्या मुलीला जो बायडेन यांनी दिली भन्नाट डेटिंग टीप; म्हणाले, “३० वर्षांची होईपर्यंत…”
खामा प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेने एका विवाहित पुरुषाबरोबर पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तालिबानी सैनिकांनी महिलेला सार्वजनिक ठिकाणी दगडं मारण्याची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यापूर्वीच अपमानाच्या भितीने महिलेने गळफास लावून आत्महत्या केली.
हेही वाचा – Amritsar : अंमली पदार्थांची खेप पोहोचवण्याऱ्या ड्रोनवर सीमा सुरक्षा दलाचा गोळीबार
आफगाणिस्तानात तालिबान सरकार आल्यानंतर महिलांवर कडक निर्बंध लावण्यात आली आहेत. महिलांना शिक्षणापासूनही वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात अफगाणिस्तानातून महिलांनी घर सोडून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच तालिबान्यांकडून महिलांना सार्वजनिक ठिकाणी दगड किंवा कोडे मारण्याच्या शिक्षाही दिल्या जात आहे.