तालिबानने अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर ताबा मिळवलेला आहे. देश तालिबान्यांच्या हातात गेल्यानंतर देशातील नागरिकांनी विमानतळावर देश सोडण्यासाठी एकच गर्दी केली होती. राजधानी काबूलवर तालिबानने रविवारी ताबा मिळवल्यानंतर हजारो नागरिकांनी देश सोडून जाण्याच्या अपेक्षेने विमानतळाकडे धाव घेतली. मात्र या विमानतळावरुन विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी काही महिला अमेरिकन सैन्यांकडे आपल्याला विमानतळावर प्रवेश मिळावा यासाठी आक्रोश करत होत्या. महिला आक्रोश करत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आम्हाला वाचवा, तालिबानी आमच्यासाठी येत आहेत अशी विनंती महिला अमेरिकन सैन्याकडे करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
Afghan families behind the barbed wires of Kabul airport, begging soldiers to let them in. “Help us, the Taliban are coming for us,” the woman cries.#Afghanistan pic.twitter.com/aCe6vgmshi
— Farnaz Fassihi (@farnazfassihi) August 18, 2021
नागरिकांचा विरोध, तालिबानचा हिंसक प्रतिसाद
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात नागरिकांनी बुधवारी दर्शवलेला विरोध या दहशतवादी संघटनेने हिंसकरीत्या मोडून काढला. यात एकजण ठार, तर सहा जण जखमी झाले. अफगाणिस्तानातील ब्रिटिश राजवट १९१९ साली ज्या दिवशी संपुष्टात आली, तो देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक दिवस आधी अनेक नागरिक पूर्व भागातील जलालाबादमध्ये गोळा झाले होते. तालिबानने या भागावर नियंत्रण मिळवल्यानंतर तेथे उभारलेला झेंडा या लोकांनी खाली उतरवला.
अफगाणिस्तानमधून कतारमध्ये आलेल्या अमेरिकन विमानाच्या लॅण्डींग गेअरमध्ये सापडले मानवी अवशेष
गोळा झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी तालिबानी हवेत गोळीबार करत असल्याचा आणि लोकांवर हल्ले चढवत असल्याचे नंतर व्हिडीओ चित्रीकरणात दिसून आले. या असंतोषाचे चित्रीकरण करू पाहणाऱ्या एका पत्रकारासह टीव्ही कॅमेरामनला दहशतवाद्यांनी मारहाण केली. या हिंसाचारात किमान १ जण ठार, तर सहा जण जखमी झाल्याचे आरोग्य विभागाच्या एका स्थानिक अधिकाऱ्याने ओळख उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.
दरम्यान, तालिबानच्या विरोधात २००१ साली अमेरिकेसोबत आघाडी केलेल्या नॉदर्न अलायन्स नागरी सेनेचा बालेकिल्ला असलेल्या काबूलच्या उत्तरेकडील पंजशीर खोऱ्यातील व्हिडीओंमध्ये, लोकांनी मोठ्या संख्येत विरोध प्रकट केल्याचे दिसले. अद्याप तालिबानच्या हाती न पडलेला हा एकमेव प्रांत आहे. विरोधाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये आपण देशाचे अध्यक्ष असल्याचे जाहीर करणारे उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह, संरक्षण मंत्री जनरल बिस्मिल्ला मोहम्मदी आणि नॉदर्न अलायन्सचा ठार झालेला नेता अहमद शाह मसूद याचा मुलगा अहमद मसूद यांचा समावेश होता. त्यांचा तालिबानला आव्हान देण्याचा इरादा आहे काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अफगाणिस्तानच्या प्रश्नावर जी-७ देशांची बैठक
अफगाणिस्तानात सैन्य माघारीनंतर तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतरच्या परिस्थितीवर जी ७ देशांची आभासी बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन व ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ठरवले आहे. बायडेन व जॉन्सन यांची अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली.
लष्कराचे शौर्य व व्यावसायिकता याची प्रशंसा करून त्यांनी म्हटले आहे की, काबूलमधून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराने मदत केली. अफगाणिस्तानबाबतचे धोरण पुढे नेण्यासाठी जागतिक समुदायासह सर्व मित्र देशात समन्वय असण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. मानवतावादी पातळीवर अफगाणी लोकांना मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे. दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तानातील घडामोडींवर संयुक्त धोरण ठरवण्यासाठी जी ७ देशांची बैठक घेण्याचे ठरवले आहे.
जी ७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे. दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे अफगाणिस्तानातील परिस्थितीवर जागतिक पातळीवर वेगवेगळ्या देशांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत. त्यांनी कतारचे उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री महंमद अब्दुलरहमान अल थानी व कुवेतचे परराष्ट्र मंत्री शेख अहमद नासेर अल महंमद अल सबाह यांना दूरध्वनी करून अमेरिकी लोक तसेच तेथील दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित परतीसाठी मदत केल्याबाबत आभार मानले आहेत, अशी माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी दिली. यापुढेही संपर्कात राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. रविवारी अफगाणिस्तानात तालिबानने काबूल जिंकून सत्ता प्रस्थापित केली होती. त्यावेळी अध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून गेले.