पणजीपासून १५ कि.मी. अंतरावरील आसगाव गावाजवळच्या जंगलात एका तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळला असून तिच्यावर बलात्कार झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जंगलात वनरक्षक गस्त घालत असताना डोके ठेचलेल्या अवस्थेतील हा मृतदेह आढळला आहे. घटनास्थळावरून संशयित स्कूटरवरून पळून जात असताना वनरक्षकांनी पाहिले आहे. फरार असलेल्या संशयिताचे नाव रणजित तुणेकर असे असून तो अंजुना गावाचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader