लिव्ह-इन पार्टनरला तारपीन तेल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत उघडकीस आला आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहित असं आरोपीचं नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना १० फेब्रुवारी रोजी घडली. संबंधित महिला आणि मोहित गेल्या सहा वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. १० फेब्रुवारी रोजी महिलेने मोहितला आपल्या मित्रांबरोबर अंमली पदार्थांचे सेवन करताना बघितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने मोहितने रागाच्या भरात महिलेवर तारपीनचं तेल टाकून तिला जिवंत जाळले.

हेही वाचा – भयानक! माजी विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या प्राचार्यास अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं

या घटनेनंतर स्थानिकांनी महिलेला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखले केले. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात पोहोचत महिलेचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिची प्रकृती नाजूक असल्याने ते शक्य झालं नाही. दरम्यान, तिची प्रकृती बिघडल्याने तिला एम्समध्ये हलवण्यात आले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही बुटांच्या कारखान्यात मजदुरी करत होती. पहिल्या पतीशी घटस्पोट घेतल्यानंतर ती आरोपी मोहित बरोबर सहा वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. महिलेला आठ वर्षांचा मुलगा तर चार वर्षांची दोन मुलगी आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मोहितविरोधात भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women died afer set on fire with turpentine oil by live in partner in delhi spb