उत्तर प्रदेशचे खादी व ग्रामोद्योग मंत्री राजाराम पांडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात जिल्हाधिकारी असलेल्या महिलेच्या सौंदर्याची मुक्तकंठाने प्रशंसा करून नवीनच वाद ओढवून घेतला आहे.
सुलतानपूर येथील कमला नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत बेरोजगार युवकांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमातील भाषणात अचानक त्यांची गाडी घसरली. ते समवेत उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी के. धनलक्ष्मी यांच्या सौंदर्याची स्तुती करू लागले. ते म्हणाले की, मी नशीबवान आहे कारण माझ्या जिल्ह्य़ाच्या जिल्हाधिकारी महिला आहेत, गेल्यावेळी कामिनी चौहान जिल्हाधिकारी होत्या. आता या आहेत. मुझे लगता था की उनसे सुंदर महिला डीएम नही हो सकती पर इस बार जब मैं प्रभारी मंत्री हूँ तो डीएम उनसे अधिक सुंदर हैं. मंत्री म्हणाले की, आताच्या जिल्हाधिकारी फारच मृदुभाषी आहेत व सक्षम प्रशासक आहेत. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भरणा असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वक्तव्याला दाद दिली.
महिला जिल्हाधिकाऱ्याच्या सौंदर्याची जाहीर तारीफ!
उत्तर प्रदेशचे खादी व ग्रामोद्योग मंत्री राजाराम पांडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात जिल्हाधिकारी असलेल्या महिलेच्या सौंदर्याची मुक्तकंठाने प्रशंसा करून नवीनच वाद ओढवून घेतला आहे.
First published on: 07-02-2013 at 04:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women distrect officer beautifulness talking is disscuss in public