लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सामाजिक मान्यतेसह रुढी, परंपरांनुसार हा सोहळा आयोजित केला जात असतो. मात्र, तामिळनाडूतील चेन्नईत पार पडलेल्या एका लग्नाच्या वेगळेपणाची सध्या चर्चा रंगली आहे. तामिळनाडूतील एका महिलेने आयुष्यभराचा जोडीदार म्हणून एका बांगलादेशी महिलेची निवड केली आहे. या दोघांचा चेन्नईत बुधवारी मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला. तामिळनाडूतील ब्राम्हण समाजाच्या विवाह पद्धतीनुसार कुटुंबीयांच्या साक्षीने या दोघींनी लग्नगाठ बांधली आहे. सुबिक्षा सुब्रमणी आणि टीना दास असे या जोडप्याचे नाव आहे.
“एखाद्या स्त्रीने…” लावणी कलाकारांना ट्रोल करणाऱ्यांना अमृता खानविलकरचे सडेतोड उत्तर
आमच्या लग्नाचे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होईल, असा आम्ही कधीच विचार केला नव्हता, अशी प्रतिक्रिया या लग्नानंतर सुबिक्षाने दिली आहे. सुबिक्षाचे कुटुंबीय कॅनेडातील कॅलगरी शहरात स्थायिक आहे. टिना दास ही बांगलादेशातील हिंदू कुटुंबातील आहे. एका अपद्वारे सहा वर्षांपूर्वी या दोघींची पहिल्यांदा याच शहरात भेट झाली होती.
“या लग्नासाठी आम्हाला आमच्या जवळच्या लोकांनी पाठिंबा दिला. ते आमच्या आनंदात सहभागी आहेत. पारंपरिक पद्धतीने आमच्या इच्छेनुसार त्यांनी आमचे लग्न लावून दिले”अशी प्रतिक्रिया देताना आम्ही दोघी खूप भाग्यवान असल्याचे सुबिक्षाने म्हटले आहे. २९ वर्षीय सुबिक्षा चार्टर्ड अकाऊटंट आहे. सुबिक्षाने १९ वर्षांची असताना आपल्या आईवडिलांना आपण समलैंगिक असल्याचे सांगितले होते. “सुबिक्षाच्या समलैंगिक असण्यामुळे भारतातील आमचे नातेवाईक संबंध तोडतील, अशी आम्हाला भीती होती. सुबिक्षाला समाजातील लोक कसे वागवतील याबाबतही आम्ही काळजीत होतो”, असे सुबिक्षाच्या आई पूर्णपुष्कला यांनी लग्नानंतर सांगितले. सुरवातीला या नात्याला विरोध करणाऱ्या सुबिक्षाच्या आई-वडिलांनी नंतर या लग्नाला संमती दिली.
“शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसरुद्दीन शाह हे स्लीपर सेलच्या…,” भाजपा मंत्र्याचं धक्कादायक विधान
“माझे बालपण मदुराईमध्ये गेले. त्यानंतर मी कतारला स्थलांतरित झाले. कॅनेडामध्ये गेल्यानंतर मी पहिल्यांदा समलैंगिक समाजाबाबत ऐकले होते” असे सुबिक्षाने माध्यमांशी बोलताना सांगितले. सुबिक्षाशी लग्न करण्याआधी टीनाने १९ व्या वर्षी विवाह केला होता. अवघ्या चार वर्षातच टीनाने पतीशी घटस्फोट घेतला. त्यानंतर ३५ व्या वर्षी टीनाने सुबिक्षाशी लग्नगाठ बांधली. समलैंगिक असल्याचे कळल्यानंतर मला कुठला आजार झाला आहे, असा कुटुंबीयांचा समज झाल्याचे टीनाने माध्यमांशी बोलताना सांगितले. यामुळे कुटुंबीयांनी काही काळ संबंध तोडला होता, असेही टीनाने सांगितले.