Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमध्ये एक असा गुन्हा घडला आहे, ज्याची कल्पना आपण फक्त चित्रपटात किंवा मालिकेत करू शकतो. ४२ वर्षीय अलका नावाच्या महिलेने स्वतःच्याच १७ वर्षीय मुलीचा खून करण्यासाठी एका मारेकऱ्याला सुपारी दिली. मात्र अलकाने जो सापळा रचला त्यात ती स्वतःच अडकली. ज्या मारेकऱ्याला पैसे दिले, त्यानेच अलकाचा खून केला. डोक चकरावून टाकणारी ही घटना उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात घडली आहे. ६ ऑक्टोबर रोजी अलकाचा मृतदेह एका शेतात आढळून आला. अलका घरी परतली नसल्यामुळे तिचा पती रमाकांतने पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर अलकाचा मृतदेह आढळून आला.

मुलीला मारण्याची सुपारी का दिली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मुलीचे प्रेमसंबंध असल्यामुळे अलका वैतागली होती. तिला समजावूनही ती सरळ मार्गावर येत नसल्यामुळे आईनेच तिचा खून करण्याचा निर्णय घेतला. यासाठी नुकताच बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आलेल्या सुभाष नामक व्यक्तीला तिने संपर्क साधला. अलकाने सुभाषला मुलीचा खून करण्यासाठी ५० हजारांची सुपारी दिली.

RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक

हे वाचा >> Video: महिलेच्या वेशात चोर आला अन् अवघ्या २१ सेकंदात २८ किलोचे दागिने चोरून पळाला, CCTV Video व्हायरल

कहानी मे ट्विस्ट कसा आला?

अलकाने जेव्हा सुभाषला सुपारी दिली, तेव्हा तिला माहीत नव्हतं की, तिच्या मुलीचा प्रियकर ३५ वर्षांचा सुभाषच आहे. सुभाषनं तिच्या मुलीला एक मोबाइल दिला होता, ज्यावरून ते दोघे संपर्कात असायचे. सुभाषला सुपारी मिळाल्यानंतर त्याने हा प्लॅन मुलीला सांगितला. यानंतर मुलीने सुभाषला लग्नाची मागणी घालून आईचाच काटा काढण्याची समजूत घातली आणि त्या दोघांनी अलकालाच संपविण्याची योजना आखली.

हे ही वाचा >> बाई काय हा प्रकार! दुर्गा पूजेला तोकडे कपडे घालून दर्शन; टीका होताच मॉडेलने पोस्ट केला ‘तसा’ फोटो

यानंतर सुभाषनं मुलीचा खून केला असल्याचे भासवले आणि फेक फोटो अलकाला पाठवून सुपारीची पुढची रक्कम मागितली. अलका सुभाषला भेटण्यासाठी आग्रा येथे गेली असताना सुभाषनं तिला खरंखरं सांगून टाकलं. यानंतर सुभाष, अल्का आणि तिची मुलगी आग्र्याहून एकत्र निघाले. एटा येथे येत असताना दोघांनी मिळून अलकाचा गळा दाबून खून केला आणि एका बाजरीच्या शेतात तिचा मृतदेह फेकला.

अलकाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावून अल्पवयीन मुलगी आणि सुभाषला अटक केली.

Story img Loader