Women Kills Husband in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास धरून महिलेने आपल्याच पतीला जेवणातून विषही पाजले. परिणामी पतीचा मृत्यू झाला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. शैलेश कुमार (३२) असं मृत तरुणाचं नाव असून त्यांच्या वैवाहित जीवनात अनेक अडचणी होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी देशभर करवा चौथ साजरा करण्यात आला. करवाचौथच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास धरतात. उत्तर प्रदेशातील कौशंबी येथे शैलेश कुमार याच्या पत्नीनेही करवा चौथचा उपवास धरला होता. रविवारी सकाळपासूनच शैलेश करवा चौथच्या विधीची तयारी करत होता. परंतु, उपवास सुटण्याआधीच उभयंतामध्ये जोरदार भांडण झालं. परंतु, थोड्यावेळाने परिस्थिती निवळली आणि शैलेश कुमार याची पत्नी सरिता स्वयंपाक करायला लागली. उपवास सोडल्यानंतर तिने पतीलाही जेवायला वाढलं. परंतु, तिने पतीच्या जेवणात विष कालवलं. ते जेवण तिने नवऱ्याला जेवायला दिलं आणि ती शेजारी निघून गेली.

हेही वाचा >> “तिला वाचवा, ती मरेल”, एवढं बोलून प्रियकर कोसळला; रक्ताच्या थारोळ्यात प्रेयसीला पाहून प्रियकराचा ओढवला मृत्यू!

काही वेळातच शैलेशची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. परंतु, मृत्यूपूर्वीच त्याने व्हिडिओ रेकॉर्ड ठेवला होता. या व्हिडिओमध्ये त्याने विष प्राशन केल्याचा आरोप केला.

पत्नीला अटक, मृतदेहाचं शवविच्छेदन होणार

दरम्यान, शैलेशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. शैलेशच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सविताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आोपी महिलेला अटक करून तिची चौकशी केली चालू केली आहे. दरम्यान, शैलेशच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

कौशांबीचे पोलीस अधीक्षक ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी या घटनेला दुजोरा दिला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पतीचे प्रेमसंबंध असल्याचा पत्नीला संशय होता. त्यामुळे तिने पतीची हत्या केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women kills husband in uttar pradesh by doing karwa chauth fast serving him poisoned sgk