प्रसिद्ध लोकप्रिय मल्याळम अभिनेता विजय बाबूवर बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. चित्रपटांमध्ये काम देण्याच्या आमिषाने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप संबंधित महिलेने केला आहे. याबाबत त्या महिलेने एर्नाकुलम दक्षिण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून विजय बाबू हा सातत्याने माझे शारिरिक शोषण करत आहे, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमातंर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेने २२ एप्रिल रोजी विजय बाबू विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी तिने विजय बाबूवर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर विजय बाबूने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र सध्या तो फरार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Crime case against a motorist, pune, motorist act bad with woman, pune news, pune latest news,
पुणे : महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या मोटारचालकावर गुन्हा

रस्त्यावर सापडलेल्या नवजात मुलीला कुटुंबाचा भाग बनवण्याची होती प्रियांका चोप्राची इच्छा, पण आईनेच केला विरोध

विजय बाबूविरुद्ध बलात्कार आणि गंभीर प्रकारे शारीरिक इजा पोहोचवल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. त्या महिलेने दिलेल्या तक्रारीत तिने विजय बाबूवर पाच गंभीर आरोप लावले आहेत. ते पाच आरोप नेमके काय? याबद्दल जाणून घेऊया.

  • १. जेव्हा मी या सिनेसृष्टीत नवीन होती, तेव्हा विजय बाबूने एका चांगल्या मित्राप्रमाणे माझी काळजी घेतली. मला नीट मार्गदर्शन केले. पण त्यासोबतच तो माझे शारिरिक शोषणही करत होता, असा आरोप त्या महिलेने केला आहे.
  • २. जेव्हा मी शारिरिक संबंध ठेवण्यासाठी नकार द्यायची, तेव्हा विजय बाबू माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याशी शारिरिक संबंध ठेवायचे. ते माझा बलात्कार करायचे. जवळपास दीड महिने विजय बाबूने माझा बलात्कार केला, असेही ती महिला म्हणाली.
  • ३. विजय बाबू हा अनेकदा मला ड्रग्ज द्यायचा किंवा दारु पाजायचा. ज्यामुळे मला गुंगी यायची. यानंतर विजय हा माझे लैंगिक शोषण करायचा, असाही गंभीर आरोप त्या महिलेने केला आहे.
  • ४. त्यापुढे ती म्हणाली, विजय बाबू हा माझ्यासाठी राक्षस आहे. त्याने केवळ लग्न आणि चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देऊन माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यासोबत माझे जीवन उद्धवस्त करण्याची धमकी दिली होती. इतकंच नव्हे तर त्यांनी माझा खूप शारीरिक छळ केला.
  • ५. त्यासोबत मला विजय बाबूने धमकी दिली होती की, जर तिने याबाबत कोणाला काहीही सांगितले तर तो माझे खासगी व्हिडीओ सार्वजनिक करेल.

“बॉलिवूडमधील कपूर कुटुंबाप्रमाणेच…”, दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवींनी व्यक्त केली ‘ती’ इच्छा

कोण आहे अभिनेता विजय बाबू?

विजय बाबू हे मल्याळम इंडस्ट्रीतील एक फार मोठे नाव आहे. त्याने आपल्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. तो फक्त अभिनेता नाही तर त्याने अनेक चित्रपटांचीही निर्मिती केली आहे. त्याचे ‘फ्रायडे फिल्म हाऊस’ नावाचं प्रोडक्शन हाऊसही आहे. याशिवाय ‘फिलिप्स अँड द मंकी पेन’साठी निर्माता म्हणून त्याला ‘सर्वोत्कृष्ट बालचित्रपट’साठी केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.

Story img Loader