Woman poisons Boyfriend For 252 Crore : पैशांच्या हव्यासाने अनेकांचे जीव घेतले जातात. अनेकदा साथीदाराचीही हत्या केली जाते. आता असाच एक धक्कादायक प्रकार अमेरिकेतील नॉर्थ डकोटा येथे घडलाय. बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्ती आपल्या नावावर होईल या हेतुने तिने दहा वर्षे ज्याच्यावर प्रेम केलं त्याचीच हत्या केली. पण हत्या केल्यानंतर तिला वस्तुस्थिती समजली अन् पश्चाताप करण्याव्यतिरिक्त तिच्या हाती काही उरलं नाही. आता तिला २५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

इना थिया केनेअर या ४८ वर्षीय महिलेने ५१ वर्षीय स्टिव्ह रिले यांची हत्या केली. स्टिव्ह रिले यांचा ५ सप्टेंबर २०२३ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या चहामध्ये विष टाकण्यात आलं होतं. स्टिव्ह रिले यांना मिळालेले २५२ कोटी तो वारसाहक्काने देऊन टाकणार आहे असं इनाला कळलं होतं. परंतु, त्याला २५२ कोटी रुपये मिळणार आहेत हे वृत्तच खोटं निघालं. २५२ कोटी रुपये मिळणार असल्याचा मेल रिले यांना आला होता. परंतु, हा मेलच खोटा होता. या खोट्या मेलवर तिने विश्वास ठेवून स्टिव्ह रिले यांची हत्या केली.

हेही वाचा >> सासरच्या जाचाला कंटाळलेल्या जावयानं सुटकेसाठी थेट लॉरेन्स बिश्नोईचं घेतलं नाव; पोलीसही चक्रावले!

गेल्या दहा वर्षांपासून रिले आणि इना नातेसंबंधात होते. ज्यादिवशी इनाने रिलेची हत्या केली त्यादिवशी ती सातत्याने वकिलाच्या संपर्कात होती. चहातून विष मिसळून दिल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तिने मुद्दाम त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं. उशिरापर्यंत तिने त्याच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत. शेवटी त्याचा मृत्यू झाला. परंतु, स्टिव्ह रिले यांच्या मित्रांनी इनाविरोधात साक्ष दिली. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लागला.

हेही वाचा >> Hyderabad : मित्राच्या वाढदिवसाला गेला, कुत्र्यासोबत खेळता खेळता तोल गेला अन्…; ‘त्या’ हॉटेलमध्ये विद्यार्थ्याबरोबर घडलं अघटित!

इनाला आता २५ वर्षांची शिक्षा

शवविच्छेदन अहवालातून त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचं समोर आलं. त्यामुळे रिलेच्या कुटुंबियांनी इनाविरोधात संताप व्यक्त केला. कोर्टातच रिलेच्या बहिणीने इनाला सुनावलं. “एखाद्याला आपल्यापासून दूर नेणं तुझ्यासाठी सोपं असेल, पण हे दुःखदायक आहे”, असं रिलेची बहीण म्हणाली. तर रिलेच्या मुलानेही केनेयरला स्वार्थी असल्याचं म्हटलं. दरम्यान, याप्रकरणी इनाला आता २५ वर्षांची शिक्षा झाली असून तिला २ लाख ९० हजारांचा दंड ठोठावला आहे. हा निधी रिलेच्या कुटुंबियांना देण्यास सांगितलं आहे.