अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा महिलांविरोधात हीणकस आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या शिक्षा देण्याचा प्रघात तालिबानकडून सुरू करण्यात येत आहे. व्याभिचाराबद्दल यापुढे महिलांना सार्वजनिक ठिकाणी दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तालिबानचे प्रमुख नेते मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा यांनी ही ही घोषणा केली असून त्यांचा संदेश मागच्या शनिवारी टीव्हीवर दाखविण्यात आला, असे वृत्त टेलिग्राफने दिले आहे.
टेलिग्राफने या व्हिडिओला प्रसारित केले असून त्यामध्ये अखुंदजादा म्हणतो की, आंतरराष्ट्रीय समुदाय स्त्रियांच्या ज्या हक्कांची वकिली करतो, ते हक्क तालिबानच्या इस्लामिक शरियाच्या व्याख्येविरोधात आहे. तुम्ही म्हणता की, महिलांना दगडाने ठेचून जीवे मारणे महिलांच्या अधिकारांच्या विरोधात आहे. तर आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही लवकरच व्याभिचाराच्या विरोधात या शिक्षेची अंमलबजावणी करणार आहोत. आम्ही महिलांना सार्वजनिक ठिकाणी उभे करून फटके मारू. त्यांना दगडाने ठेचून टाकू.
“भाजपाचं सरकार गेलं की बघून घेऊ”, १७०० कोटींच्या नोटीशीनंतर राहुल गांधींचा सीबीआय, ईडीला इशारा
अखुंदजादा पुढे म्हणाला की, फक्त काबूल ताब्यात घेऊन तालिबानचे काम संपलेलेल नाही, आता तर आमचे काम सुरू झाले आहे. २०२१ साली पुन्हा एकदा अफगाणिस्तानात तालिबानची राजवट सुरू झाल्यापासून येथील महिलांना अनेक अडचणींचा आणि आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तालिबानच्या राजवटीत मुली, महिलांना शिक्षण घेण्याची परवानगी नाही, त्यांना रोजगार करता येत नाही, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाही.
तालिबान सत्तेत आल्यानंतर लगेचच पहिल्या महिन्यात मुलींना माध्यमिक शाळेत जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये विद्यापीठाचे दरवाजेही बंद करण्यात आले. तसेच महिलांना नोकरी करण्यापासूनही रोखण्यात आले.
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
अफगाणिस्तानमध्ये महिला आणि मुलींसाठी जागतिक स्तरावरील सर्वात वाईट परिस्थिती आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले होते.