Womens Day 2025 : आज (८ मार्ज) आंतरराष्ट्रीय महिला दिन. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनीय काम केलेल्या प्रेरणादायी सहा महिलांचा अनोखा सन्मान करण्यात आला आहे. महिला दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडिया अकाऊंट आजच्या दिवसासाठी सहा महिला सांभाळणार आहेत. या सहा प्रेरणादायी महिला आजच्या दिवसांसाठी पंतप्रधानांचे सोशल मीडिया अकाऊंट्सचं कामकाज पाहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी यांच्च्या सोशल मीडिया अकाउंट्सचं काम आज दिवसभर या सहा महिला सांभाळणार आहेत. देशातील वेगवेगळ्या भागातील या महिला आहेत. या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा एक वेगळा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं.विविध क्षेत्रात काम करणाऱ्या या सहा महिलांमध्ये चेन्नईच्या वैशाली रमेशबाबू, दिल्लीच्या डॉ. अंजली अग्रवाल, नालंदाच्या अनिता देवी, भुवनेश्वरच्या एलिना मिश्रा, राजस्थानच्या अजैता शाह आणि शिल्पी सोनी यांचा समावेश आहे.

‘या’ सहा महिला कोण आहेत?

एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी

एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी या दोन्ही महिला अत्याधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञान संशोधनातील शास्त्रज्ञ आहेत. एलिना मिश्रा भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे अणुशास्त्रज्ञ आहेत.तसेच शिल्पी सोनी या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) एक अंतराळ शास्त्रज्ञ आहेत.

अजैता शाह कोण आहेत?

फ्रंटियर मार्केट्सच्या संस्थापक आणि सीईओ अजैता शाह यांनी जवळपास ३५,००० हून अधिक महिला उद्योजकांना सक्षम करून डिजिटली सक्षम बनवलं आहे. ग्रामीण उद्योजकतेच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलेलं आहे. डिजिटल दृष्ट्या महिला उद्योजिकांना अधिक सक्षम करण्याचं काम त्या करत आहेत.

वैशाली रमेशबाबू

वैशाली रमेशबाबू यांनी बुद्धिबळात लहान वयातच अतिशय प्रावीण्य मिळवलेलं आहे. बुद्धिबळातील प्रतिभावान खेळाडू म्हणून वैशाली रमेशबाबू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. वैशाली रमेशबाबू या वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळत आहेत, तसेच २०२३ मध्ये त्यांनी बुद्धिबळ ग्रँडमास्टरचा प्रतिष्ठित किताब मिळवला होता.

अनिता देवी

अनिता देवी यांना ‘बिहारची मशरूम लेडी’ म्हणून ओळखलं जातं. अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्या पुढे आलेल्या आहेत. अनिता देवी यांनी २०१६ मध्ये माधोपूर शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. मशरूम लागवडीच्या माध्यमातून अनिता देवी यांनी शेकडो ग्रामीण महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आणि आर्थिक आणि महिला सक्षमीकरणासाठी महत्वाचं पाऊल टाकलं.

डॉ.अंजली अग्रवाल

डॉ.अंजली अग्रवाल या समर्थ्यम सेंटर फॉर युनिव्हर्सल अ‍ॅक्सेसिबिलिटीच्या संस्थापक आहेत. गेल्या जवळपास तीन दशकांच्या काळात त्यांनी सर्वसमावेशक गतिशीलता आणि अडथळा-मुक्त पायाभूत सुविधा सुनिश्चित करण्यासाठी डॉ.अंजली अग्रवाल या काम करत आहेत. तसेच शाळा आणि सार्वजनिक ठिकाणे अपंग लोकांसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सहा महिलांच्या योगदानाचं कौतुक केलं आहे. या संदर्भात सोशल मीडिया अकाऊंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट देखील केली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, “त्यांचा दृढनिश्चय आणि यश आपल्याला महिलांच्या अमर्याद क्षमतेची आठवण करून देते. आज आणि दररोज आम्ही विकसित भारत घडवण्यात त्यांचं योगदान साजरे करतो.”