पीटीआय, हावेरी
कुणी हिंदूंच्या भावना दुखावल्या, तर आम्ही गप्प बसणार नाही असे सांगून कर्नाटकातील गणेशोत्सवाचे समारंभ थांबवण्याचे प्रयत्न करणाऱ्या र्सवना भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी इशारा दिला आहे. महान सनातन धर्म माझ्या शिरांमधून वाहत आहे, असेही ते म्हणाले.
कुणी आमच्या सनातन धर्माची मलेरियाशी तुलना केली तर आम्ही गप्प राहावे काय? सनातन धर्म आमच्या धमन्यांमधून वाहात आहे. कुणी आमच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही स्वस्थ बसणार नाही’, असा इशारा त्यांनी दिला. राज्यातील गणेशोत्सव समारंभ थांबवण्याचे प्रयत्न होत आहेत, असा आरोप हावेरी जिल्ह्यातील बंकापूर येथे हिंदू जागृती संमेलनात बोलताना बोम्मई यांनी केला.00
हेही वाचा >>>मित्राला २००० रुपये ट्रान्सफर केले अन् स्वत:च्या बँक खात्यात आढळले ७५३ कोटी, नेमकं काय घडलं?
आम्ही त्या सनातन धर्माचे आहोत, जो जगातील सर्व मानवांच्या कल्याणाची इच्छा करतो. सर्व धर्माचे लोक येथे राहतात. पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये हे शक्य नाही’, असे त्यांनी म्हटल्याचे त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
येथे प्रत्येकाचा स्वीकार केला जातो. सनातन धर्माच्या या स्वरूपामुळे काही जण त्याला डेंग्यू आणि मलेरिया म्हणतात. इतर धर्माची अशा रोगांशी तुलना करण्याची त्यांच्यात हिंमत आहे का? त्यांनी तसे केले असते तर काय झाले असते?’, असा प्रश्न बोम्मई यांनी विचारला.