ममता बॅनर्जी यांची टीका; मतदानातूनच जनतेचा कौल मिळण्याचा विश्वास
पश्चिम बंगालमधील प्रमुख विरोधी पक्ष केवळ आपल्याविरुद्ध तक्रारी नोंदवीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. एका विशिष्ट पक्षाविरुद्ध राजकीय सूड घेतला जात आहे, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेस, माकप आणि भाजप अहोरात्र आपल्याविरुद्ध तक्रारीच नोंदवीत आहेत, आपल्याला त्यांच्याकडून प्रमाणपत्र घेण्याची इच्छा नाही तर आपल्याला जनतेकडून प्रमाणपत्र मिळण्याची गरज आहे. बिरभूम जिल्ह्य़ातील निवडणूक सभेत त्या बोलत होत्या.
कोलकाता पोलीस आयुक्तांना पदावरून हटविण्यात आले, अनेक अधिकाऱ्यांना बदलण्यात आले, हे सर्व काँग्रेस, माकप आणि भाजपच्या आदेशावरून केले जात आहे, एका विशिष्ट पक्षाविरुद्ध सूड घेतला जात आहे, असे त्या म्हणाल्या.

Story img Loader