दोषी लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्यापासून वाचवू पाहणाऱ्या अध्यादेशाबाबत बोलताना माझे शब्द चुकीचे असतील पण माझी भावना चुकीची नव्हती, असे उद्गार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे पत्रकारांसमोर काढले.
मी वापरलेले शब्द चुकीचे होते, असे मला माझ्या आईनेही सुनावले. मी कठोर शब्द वापरले, हे खरे पण माझी भावना प्रामाणिक होती. मी तरुण आहे, असेही राहुल यांनी सांगितले.
अध्यादेशाला केलेल्या विरोधाचे समर्थन करीत ते म्हणाले, माझे मत मांडण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. पक्षातीलच अनेकांना हा अध्यादेश नको होता. जे चुकीचे होते त्याच्याविरोधात आवाज उठवल्याबद्दल मला दोषी का मानता, असा सवालही त्यांनी केला. मी माझ्या मनात काय होते ते बोललो, त्याबाबत घटकपक्षांनी आणि विरोधकांनी इतक्या प्रतिक्रिया दिल्या की मी काहीक्षण गोंधळून गेलो होतो, असेही राहुल म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा