मंगळावर नासातर्फे पाठविण्यात आलेल्या ‘क्युरियॉसिटी’ या संशोधन करणाऱ्या ‘यंत्रमानवी गाडी’चे (रोव्हर) काम पूर्ववत सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे रोव्हरचे काम बंद पडले होते. नासाच्या क्युरियॉसिटी प्रकल्पाचे व्यवस्थापक जेनिफर ट्रॉस्पर यांनी याबाबत विशेष माहिती देताना सांगितले की, क्युरियॉसिटी आपले नमुना पृथक्करण आणि शास्त्रीय विश्लेषणाचे काम येत्या आठवडय़ाभरात पुन्हा सुरू करू शकेल. १६ मार्च रोजी, क्युरियॉसिटी अचानकपणे बंद पडला. सॉफ्टवेअरमधील बिघाड हे यामागील कारण असल्याचे लक्षात आले. गेल्या तीन आठवडय़ांत दुसऱ्यांदा हा प्रकार घडला होता. मात्र या समस्येवर मात करण्यात शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या चमूला यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा