३० वर्षांच्या एका तरुणाचा मृत्यू ( Worker Death ) अवयव ढासळल्याने झाला आहे. हा माणूस १०४ दिवस सलग काम करत होता. या कालावधीत त्याने एकच दिवस सुट्टी घेतली. ही घटना चीनमध्ये घडली आहे. अ बाओ नावाचा एक रंगकाम करणारा कामगार होता. जून २०२३ मध्ये त्याचा मृत्यू ( Worker Death ) झाला. या प्रकरणात न्यायालयाने त्याला काम देणारी कंपनी २० टक्के जबाबदार आहे असं म्हटलं आहे.

अ बाओचा मृत्यू कसा झाला?

अ बाओ नावाचा या तरुणाने फेब्रुवारी २०२३ या महिन्यात एक करार केला. झोशुअन मधल्ये आपण कराराप्रमाणे काम करु हे मान्य केलं. मात्र त्याच्या कामाचा ताण वाढत गेला आणि अखेर जून मध्ये त्याचा मृत्यू ( Worker Death ) झाला. त्याने कराराप्रमाणे काम सुरु केलं. त्यानंतर तो सलग १०४ दिवस काम करत होता. या संपूर्ण कालावधीत ६ एप्रिल २०२३ या दिवशी त्याने एक सुट्टी घेतली होती. २५ मे पासून त्याची प्रकृती ढासळत गेली. त्याला २८ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

१ जून २०२३ ला कामगाराचा मृत्यू

२८ जून ते १ जून या कालावधीत अ बाओ रुग्णालयात होता. १ जून २०२३ ला त्याचा मृत्यू ( Worker Death ) झाला. यानंतर त्याच्या कुटुंबाने त्याला काम देणाऱ्या कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली. कंपनीने त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन त्यांच्या कराराला महत्त्व दिलं असा आरोप अ बाओच्या कुटुंबाने केला. अ बाओला सुट्टी देण्यात आली नाही, त्याच्याकडून सलग काम करुन घेण्यात आलं आणि त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या कुटुंबाने केला.

कंपनीने काय युक्तिवाद केला?

या प्रकरणात कंपनीने सांगितलं की अ बाओवर कामाच्या तासांचा काहीही ताण नव्हता. तो त्याच्या इच्छेप्रमाणे काम करु शकतो अशी मुभा त्याला देण्यात आली होती. त्याचं अधिकचं काम हे त्याच्या आधी असलेल्या आजारांमुळे कदाचित उद्भवलेलं असू शकतं. मात्र न्यायालयाने या घटनेसाठी कंपनी २० टक्के जबाबदार आहे असा निर्णय दिला आहे. सलग १०४ दिवस काम केल्याने त्याला बराच त्रास झाला. चायनातील लेबर लॉप्रमाणे आठ तासांचं काम हे रोज कामगारांनी केलं पाहिजे, आठवड्याला फार तर ४४ तास काम करु शकतो. मात्र या कामगाराच्या मृत्यूला कंपनीला २० टक्के जबाबदार धरण्यात आलं आहे. चीनच्या न्यायालयाने ४० लाख युआन ( अंदाजे ४७ लाख ४६ हजार भारतीय रुपये ) एवढी भरपाई देण्यास सांगितलं आहे. तसंच १० हजार युआन (१ लाख १७ हजार भारतीय रुपये अंदाजे) ही अतिरिक्त भरपाईही देण्यास सांगितलं आहे.