पूर्वग्रहदूषित आणि भेदभावाबरोबरच काम करण्याच्या ठिकाणी असलेल्या तणावामुळे नोकरी करणा-या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे एका सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे.
नोकरी करणा-या महिलांमध्ये अन्य महिलांपेक्षा स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ७० टक्के अधिक असल्याचे आढळून आल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. १९७० च्या दशकात वयाची ३० वर्षे पार केलेल्या महिलांवर अनेक दशके केलेल्या सर्वेक्षणावरून कामाच्या ठिकाणी असलेल्या तणावाचा आणि कर्करोगाच्या लागणीचा संबंध निदर्शनात आला. त्याचप्रमाणे, ज्या महिलांनी जास्त काळासाठी नोकरी केली, त्या महिलांमध्ये कर्करोग लागणाची भीती अधिक असल्याचे दिसून आले. १९७५ साली वयाच्या ३६ व्या वर्षांत असलेल्या अशा जवळजवळ चार हजार महिलांचा समावेश या सर्वेक्षणात करण्यात आला होता. या सर्वेक्षणाचा अहवाल ‘दि इंडिपेंडेन्ट’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या सर्वेक्षणाच्या प्रमुख डॉ. तात्याना पुद्रोवोस्का म्हणाली, ज्या महिलांनी १९७० च्या दशकात व्यवस्थापन क्षेत्रात पाऊल ठेवले, त्यांना त्यावेळच्या समाजावर असलेल्या सांस्कृतिक पगड्यामुळे पूर्वग्रहदूषितपणाचे आणि भेदभावाचे शिकार व्हावे लागले. जुन्या रुढी-परंपरांनुसार असेच मानले जायचे की नेता म्हणून महिलांपेक्षा पुरूष अधिक सक्षम असतात. त्या म्हणाल्या, पुरूष किंवा महिला कोणत्याही महिला अधिका-याच्या हाताखाली काम करण्यास तयार नसतात. कारण महिलांची मानसिकता व्यवस्थापनाच्या पदासाठी अयोग्य मानली जाते. महिला अधिका-यांना पूर्वग्रहदूषिताचा, भेदभाव, सामाजिक विषमता त्याचप्रमाणे कर्मचारी, सहकारी आणि वरिष्ठ यांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. नोकरी करणा-या महिलांना आजही अशाच प्रकारच्या ताणतणावांचा सामना करावा लागत असल्याने कर्करोगाच्या वाढीचा धोका आजही कायम असल्याचे मत डॉ. तात्याना ने मांडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा