जागतिक बँकेने पंजाबमधील विकासकामांसाठी १५० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जाच्या माध्यमातून पंजाबमध्ये सार्वजनिक सोईसुविधांमध्ये सुधारणा करण्याचे काम केले जाणार आहे. पंजाब सरकारकडून वेगवेगळ्या सरकारी विभागांची क्षमता वाढवण्याचे काम केले जात आहे. पंजाबमधील शास्वत विकास वाढीसाठी आम्ही हा निधी देत आहोत, असे जागतिक बँकेने सांगितले आहे.
भगवंत मान यांच्यावरील ‘त्या’ आरोपांची चौकशी करणार, ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती
आतापर्यंत पंजाब राज्याचा क्षमतेपेक्षा कमी विकास झालेला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पंजाबाच्या विकासकामाला पाठिंबा देत आहोत. वेळेवर, किफायतशीर आणि उत्तम दर्जाच्या सार्वजिक सेवा पुरवण्याच्या पंजाबच्या प्रयत्नांत जागतिक बँक एक सहकारी असल्याचा आम्हाला आनंद आहे, असे जागतिक बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा >> VIDEO : कबड्डी स्पर्धेदरम्यान खेळाडूंना शौचालयात जेवण; उत्तर प्रदेशाच्या सहारनपूरमधील धक्कादायक प्रकार
मिळालेल्या निधीच्या माध्यमातून पंजाबमध्ये दोन टप्प्यांत काम केले जाईल. पहिल्या टप्प्यात पंजाबमध्ये सार्वजनिक सेवा-सुविधांची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच वितरण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी महापालिकांना प्रोत्साहित केले जाईल. तसेच अमृतसर आणि लुधियानासारख्या शहरांमधील निवडक भागात पूर्णवेळ पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पाणीगळती तसे पाणी वितरण प्रणालीमध्ये या निधीच्या मदतीने सुधारणा करण्यात येतील.