करोनाने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतलं आहे. त्यामुळे लॉकडाउनसारखा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गर्दी करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटन आणि लोकं नसल्याने सर्वाधिक फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. मात्र नेदरलँडच्या एक फूड आउटलेटनं एक भारी कल्पना समोर आणली आहे. या आउटलेटनं जगातील सर्वात महागडा बर्गर तयार केला आहे. याची किंमत ऐकून भल्याभल्यांना घाम फुटत आहे. या बर्गरला ‘द गोल्डन बॉय’ असं नाव देण्यात आलं आहे. या बर्गरची किंमत जवळपास ४ लाख ४७ हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे या बर्गरमध्ये नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न सर्वसामनान्यांना पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गोल्डन बॉय बर्गर महागडा असल्याचं कारण?

या बर्गरमध्ये सोन्याचा वापर करण्यात आला आहे. तसेच वर सोन्याच वर्ख लावलेला आहे. त्याचबरोबर ट्रफल, किंग क्रॅब, बेलुगा कॅवीआर, मियॉनिज आणि डोम पॅरिग्नॉन शॅम्पियनचा वापर करण्यात आला आहे.

वूर्थुइजेन शहरातील फूड आउटलेट डि डॉल्टनचे मालक रॉबर्ट जेन डि वीन यांचं महागडा बर्गर बनवण्याचं स्वप्न होतं. यासाठी त्यांनी गिनीज बुक रेकॉर्डच्या नोंदीही तपासल्या. तेव्हा त्यांना यापूर्वी अमेरिकेतील एका व्यक्तीच्या नावावर महागडा बर्गरची नोंद असल्याचं दिसून आलं. अमेरिकेच्या जूसीज ग्रिल यांनी ३ लाख ७२ हजार किंमतीचा बर्गर तयार केला होता. २०११ साली त्यांनी या बर्गरची निर्मिती केली होती. या बर्गरचं वजन ३५२ किलो ४४ ग्रॅम इतकं होतं. मात्र हा बर्गर एकटा व्यक्ती खाण्यास असमर्थ होता. त्यासाठी वीन यांनी एक व्यक्ती खाऊ शकेल असा महागडा बर्गर बनवण्याचा निर्धार केला आणि प्रत्यक्षात ते उतरवलं.

चेटकीण!, सोशल मीडियावरील ‘या’ व्हिडिओमुळे नेटकऱ्यांचा थरकाप

“हा बर्गर खूप महाग आहे पण तुम्ही तो हाताने खाऊ शकता. कारण बर्गर खाण्याची तीच एक पद्धत आहे. लहानपणापासूनच विश्वविक्रम करण्याचं माझं स्वप्न होतं. आणि ते सत्यात उतरणं अद्भुत आहे.” असं रॉबर्ट जेन डि वीन यांनी सांगितलं.