दुबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीवर ताबा मिळविण्याच्या आणि पॅलेस्टिनींच्या कायमस्वरुपी विस्थापित होण्याच्या प्रस्तावाच्या घोषणेनंतर अमेरिकेचे मित्रदेश आणि मित्रदेश नसलेल्या देशांनीही या घोषणेला जोरदार विरोध केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाझा पट्टीतून २० लाखांहून अधिक पॅलेस्टिनींच्या विस्थापनाला पश्चिम आशियातील इजिप्त, जॉर्डन आणि इतर देशांनी विरोध केला आहे. तर, या भागात गोंधळ आणि तणाव निर्माण करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. या ठिकाणी ज्यूंनी बळकावलेल्या प्रदेशाबद्दल, त्यांनी घडवून आणलेल्या वंशहत्यांबद्दल त्यांना गुन्हेगार ठरविण्याऐवजी त्यांचा सन्मान केला जात आहे असा आरोप हमासने केला आहे.

इराणच्या चलनाचा विक्रमी नीचांक

तेहरान : इराणचे चलन ‘रियाल’ने बुधवारी विक्रमी नीचांक गाठला. एका डॉलरला साडेआठ लाख रियाल इतक्या विक्रमी नीचांकावर ते घसरले. ट्रम्प यांनी इराणकडून होणारी तेलनिर्यात थांबविण्याचे आणि संयुक्त राष्ट्रांनी इराणवर निर्बंध पुन्हा लावावेत, असे आवाहन करणाऱ्या आदेशावर सही केली.

यूएनएचआरसीमधून अमेरिकेची माघार

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेतून (यूएनएचआरसी) अमेरिका बाहेर पडत असण्याच्या आदेशावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे पॅलेस्टिनी निर्वासितांच्या मदतीसाठी कोणतीही निधी देणे यापुढे ‘यूएनएचआरसी’ला शक्य होणार नाही. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या ‘युनेस्को’मधील सहभागाचा फेरआढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी मंगळवारी दिले.ग्रीनलँडमध्ये परदेशी राजकीय देणग्यांवर बंदी

नुक : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर, ग्रीनलँडच्या पार्लमेंटने मंगळवारी एक ठराव मंजूर करून परदेशी किंवा निनावी राजकीय देणग्या घेण्यावर बंदी घातली. ग्रीनलँडच्या राजकीय अखंडतेचे संरक्षण करणे हा या ठरावाचा उद्देश असून तो तात्काळ लागू करण्यात आला आहे.

डोनाल्ड डंख

ट्रम्प यांची कल्पना आक्रमक, धोकादायक, वेडेपणाची आणि मूर्खपणाची आहे. त्यांच्या अशा भूमिकांमुळे साऱ्या जगाला अमेरिका एक बेभरवशाचा मित्रदेश आहे, असे वाटण्याचा धोका आहे. सिनेटर ख्रिास कून्सडेमोक्रॅटिक पक्ष, अमेरिका

पॅलेस्टिनी नागरिकांचे आणि त्यांच्या अविभाज्य हक्कांचे संरक्षण करावे. ट्रम्प यांनी ठेवलेला प्रस्ताव आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा सरळसरळ भंग आहे. मेहमूद अब्बासअध्यक्ष, पॅलेस्टाइन

गाझा पट्टीतील नागरिकांचे बळपूर्वक विस्थापनास आमचा विरोध आहे. संबंधित देशांनी शस्त्रसंधी करार करून युद्धानंतर तेथील प्रशासन चालविणे, हे एक संधी म्हणून स्वीकारावे आणि पॅलेस्टाइनचा मुद्दा योग्य वळणावर आणून ठेवावा. लिन जिआनप्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय, चीन

गाझा पट्टीतून कुणाचेही विस्थापन न करता तेथे विकास होण्याची गरज आहे. परराष्ट्र मंत्रालयइजिप्त

स्वतंत्र पॅलेस्टाइनची दीर्घ काळ मागणी होत आहे. स्वतंत्र पॅलेस्टाइनबाबतची आमची भूमिका ठाम असून, ती कधीही बदलणार नाही. सौदी अरेबिया

ऑस्ट्रेलिया पश्चिम आशियामध्ये द्विराष्ट्र सिद्धांताचा उपायाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. त्या भूमिकेत आम्ही कुठलाही बदल केलेला नाही. अँथनी अल्बानीजपंतप्रधान, ऑस्ट्रेलिया

पश्चिम आशियात दोन देश (इस्रायल-पॅलेस्टाइन) व्हावेत, या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही. अमेरिकेच्या प्रस्तावावर आम्ही भाष्य करणार नाही. परराष्ट्र मंत्रालयन्यूझीलंड गाझा पट्टीबाबत ट्रम्प यांचा प्रस्ताव या भागातील कुणी अथवा आम्ही कधीही स्वीकारणार नाही. असा विचार करणेही चुकीचे आणि हास्यास्पद आहे. हकन फिदान, परराष्ट्रमंत्री, तुर्किये