दावोस : जगातील पाच सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची संपत्ती २०२० पासून दुप्पट झाली असून तब्बल पाच अब्ज लोक अधिक गरीब झाले आहेत. दावोस येथे सुरू झालेल्या ‘जागतिक आर्थिक परिषदे’च्या (डब्लूईएफ) पहिल्या दिवशी ‘ऑक्सफॅम’ या संस्थेने आपला वार्षिक विषमता अहवाल प्रसिद्ध केला. त्यातून अनेक धक्कादायक निष्कर्ष उजेडात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘इनइक्वालिटी इंक’ या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत पाच व्यक्तींची (सर्व पुरुष) संपत्ती २०२०मध्ये ४०५ अब्ज डॉलर होती, ती आता ८६९ डॉलरवर गेली आहे. संपत्तीवाढीचा हा वेग ‘तासाला १४ दशलक्ष डॉलर’ इतका आहे. जगातील सर्वात मोठया १० कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी (सीईओ) सात ‘सीईओ’ किंवा मुख्य समभागधारक हे अब्जाधीश (डॉलरमध्ये) असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. त्यांची एकत्रित संपत्ती १०.२ ‘ट्रिलियन’ इतकी आहे. जागतिक कल असाच राहिला तर, येत्या दशकभरात जगातील पहिला ‘ट्रिलियनर’ (एक हजार अब्ज डॉलर संपत्ती असलेली व्यक्ती) पाहायला मिळेल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरिबी संपण्यासाठी २२९ वर्षांचा कालावधी लागेल असे ‘ऑक्सफॅम’ने म्हटले आहे.

हेही वाचा >>> मालदीव वादावर परराष्ट्रमंत्र्यांनी मौन सोडलं; म्हणाले, “मी खात्री देऊ शकत नाही की…”

जगभरातील आघाडीच्या १४८ कंपन्यांनी १.८ ट्रिलियन (एक हजार अब्ज) डॉलर नफा कमावला असून तो तीन वर्षांच्या सरासरीमध्ये ५२ टक्क्यांनी वाढला आहे. तसेच श्रीमंत समभागधारकांना मोठया प्रमाणात परतावा मिळाला असून तर कोटयवधी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात वेतनकपात सहन करावी लागली आहे. सार्वजनिक सेवा, कंपन्यांचे नियमन, मक्तेदारी मोडून काढणे आणि कायमस्वरूपी संपत्ती व अतिरिक्त नफ्यावर कर आकारणी यांच्या माध्यमातून सार्वजनिक कृती करण्याचे आवाहन ‘ऑक्सफॅम’कडून करण्यात आले आहे.

ऑक्सफेमने जाहीर केलेल्या अहवालात २०२० पासून जगातील सर्वाधिक पाच श्रीमंत व्यक्तींची संपत्ती दुप्पट झाली असून जगभरातील तब्बल पाच अब्ज लोक अधिक गरीब झाल्याचे अधोरेखित झाले आहे.

विषमता अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

* दशकभरात जगातील पहिला ‘ट्रिलियनर’ होणे शक्य

* श्रीमंतांच्या संपत्तीवाढीचा वेग तासाला १४ दशलक्ष डॉलर

* सर्वात मोठया १० कंपन्यांचे ७ सीईओ अब्जाधीश * गरिबी संपविण्यासाठी २२९ वर्षांची प्रतीक्षा