भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची निवड चाचणी सोमवारी लखनऊमध्ये आयोजित केली होती. मात्र, चाचण्या सुरू होताच डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी रेफरींना थांबण्याचे निर्देश दिले. हे निर्देश कोणत्या तांत्रिक कारणाने किंवा दुखापतीमुळे नाही, चक्क साधुसंतांचे आशीर्वाद घेण्यासाठी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – पूर आणि महागाईमुळे पाकिस्तान आलं ताळ्यावर, भारताशी व्यापाराबाबत केली केली ‘ही’ मोठी घोषणा!

काय आहे संपूर्ण प्रकरण

सोमवारी भारतीय कुस्ती महासंघाने लखनऊ येथील SAI केंद्रात महिला कुस्ती संघासाठी निवड चाचणीचे आयोजन केले होते. चाचण्या सुरू झाल्याच्या ५४ सेकंदांनंतर कुस्तीपटूची लढत अचानक थांबवाण्यात आली. मात्र, ही लढत कोणत्या तांत्रिक कारणाने किंवा दुखापतीमुळे नाही, साधुसंतांचे आशीर्वाद घेण्यासाठी थांवण्यात आली होती. यावेळी अयोध्येतील संतांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलाण्यात आले होते. त्यामुळे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी खेळ थांबवला आणि खेळाडूंनी संतांचे आशीर्वाद घेतले. एवढंच नाही तर बृजभूषण शरण सिंग यांनी सर्व महिला कुस्तीपटूंना रांगेत बसवत फोटोही काढले आणि प्रशिक्षकांना तांत्रिक त्रुटीही निदर्शनास आणून दिल्या.

हेही वाचा – गौतम अदानी जगातले तिसऱ्या क्रमांकाचे अतिश्रीमंत; हा मान मिळवणारी पहिली आशियाई व्यक्ती, पाहा किती आहे संपत्ती

‘हे’ खेळाडू करतील देशाचे प्रतिनिधित्व

जागतिक कुस्ती स्पर्धा २०२२ सप्टेंबर १० ते १८ या कालावधीत पुढील महिन्यात सर्बियातील बेलग्रेड येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी विनेश फोगट, सरिता मोर, सोनम मलिक यांची निवड झाली आहे. तर, दिव्या काकरन, अंशू मलिक, पूजा सिहाग, साक्षी मलिक आणि पूजा धांधा या राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंनी काही कारणांमुळे निवड चाचणीत सहभाग घेतला नाही.