जगातील पहिला मोबाइल फोन कधी अस्तित्वात आला असावा याबाबत सध्या यूटय़ूबवर एक व्हिडीओ वेगाने प्रसारित होत असून त्यात एक महिला १९३८ मधील एका फिल्ममध्ये वायरलेस यंत्रणेविषयी बोलताना दिसत आहे. तोच पहिल्या मोबाइलचा पुरावा आहे असे सांगण्यात येत आहे.
यूटय़ूबवर ही व्हिडीओ तीन लाख ४२ हजार लोकांनी बघितली असून त्यात माहिती देणाऱ्या महिलेचे नाव जेरटड्र जोन्स असे आहे. या फ्लिम क्लिपमध्ये ती महिला मोबाइलसारख्याच साधनावर बोलताना दिसत आहे. हे साधन मॅसॅच्युसेटसमधील लिओमिन्स्टर येथे एका कंपनीत तयार करण्यात आले होते. या व्हिडिओचे नाव ‘टाइम ट्रॅव्हलर इन १९३८ फिल्म’ असे आहे. ही व्हिडिओ वर्षभरापूर्वी यूटय़ूबवर टाकण्यात आली आहे. अनेक ब्लॉग्जमध्ये तिचा उल्लेख आला आहे असे ‘डेली एक्स्प्रेस’ने म्हटले आहे.
असे असले तरी प्लॅनेटचेक नावाच्या यूजरने या व्हिडिओचे गूढही उलगडले असल्याचा दावा केला आहे. व्हिडिओत जी महिला बोलताना दिसत आहे ती माझी पणजी जेरटड्र जोन्स आहे असा दावा प्लॅनेटचेकने केला आहे. त्यावेळी ती सतरा वर्षांची होती व मी तिला या व्हिडिओबाबत विचारले असता ती व्हिडिओ आपलीच असल्याचे तिने सांगितले. त्या कारखान्यात डय़ूपाँटचा दळणवळण विभागही होता. वायरलेस दळणवळणाविषयी प्रयोग करीत असताना जेरटड्र व इतर पाच महिलांना वायरलेस फोन चाचणीसाठी आठवडाभर दिले होते. जेरटड्र या त्या व्हिडिओत ज्यांच्याशी बोलत आहेत ते एक वैज्ञानिक असून त्यांच्याकडेही वायरलेस फोन होता, असे प्लॅनेटचेक या यूजरने म्हटले आहे. या दाव्याबाबत निष्पक्ष पडताळणी करण्यात आलेली नाही. हा दावा खरा ठरला तर त्याचा अर्थ आताचा मोबाइल शोधल्याच्या चाळीस वर्षे आधीच मोबाइलचा शोध लागला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा