Worlds Most Powerful Passports 2024 Announced : जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची रँकिंगची यादी जाहीर झाली असून यामध्ये भारत गेल्यावर्षी यंदा खालच्या क्रमांकावर घसरला आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने ही यादी जाहीर केली आहे. या यादीत भारत जागतिक स्तरावर ८२ व्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत भारतीय पासपोर्ट धारकांना व्हिसाशिवाय ५८ देशांमध्ये प्रवास करता येतो. गेल्यावर्षीच्या तुलनेत भारत ८० व्या क्रमांकावर होता. परंतु, आता ८२ व्या स्थानकावर घसरला आहे. बिझनेस स्टॅण्डर्डने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) कडून डेटा संकलित करणारा हेन्ली पासपोर्ट इंडेक्स संस्था ही जागतिक प्रवासी विशेषाधिकारांचे मूल्यांकन करण्यासाठी एक व्यापक संसाधन म्हणून काम करते. गेल्या काही वर्षांत भारताच्या पासपोर्ट कामगिरीमध्ये लक्षणीय चढ-उतार झाले आहेत. २०१४ मध्ये भारत ७६ व्या स्थानावर होता.यावेळी ५२ देशांमध्ये व्हिसाशिवाय जाता येत होतं. तर, २०१५ मध्ये केवळ ५१ राष्ट्रांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशासह ८८व्या स्थानावर घसरण झाली. (Worlds Most Powerful Passports 2024)

passport drama
लोकसत्ता लोकांकिका : ‘पासपोर्ट’ महाअंतिम फेरीत, नागपूर विभागीय अंतिम फेरी जल्लोषात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Bangladeshi nationals residing in Pimpri issued passports from Goa Pune news
पिंपरीत वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांनी गोव्यातून काढले पासपोर्ट
Six Bangladeshi women arrested from Bhiwandi
Bangladeshi women arrested : भिवंडीतून सहा बांगलादेशी महिलांना अटक
Rohingya house in Pune
Rohingya in Pune: रोहिंग्याने बांधले थेट पुण्यात स्वतःचे घर, भारतीय पासपोर्टही मिळवले
PM Modi
PM मोदींचा ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ आता ‘वेड इन इंडिया’वर भर; देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही केलं मोठं वक्तव्य
Donald Trump
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प घेणार ऐतिहासिक निर्णय! जन्मताच अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करणारा कायदा बदलणार
Nepali woman, Indian passport, Nepali woman arrested, Mumbai airport,
नेपाळी महिलेचा भारतीय पारपत्रावर तीनवेळा सिंगापूरला प्रवास, अखेर महिलेस मुंबई विमानतळावर अटक

हेही वाचा >> विश्लेषण : बांगलादेशी नागरिकांना भारतीय पासपोर्ट मिळालाच कसा? आणि मतदानही कसे करता आले?

२०१५ पासून भारताचा पासपोर्ट कितव्या स्थानावर?

  • २०१५: ८८ वा
  • २०१६: ८५ वा
  • २०१७: ८७ वा
  • २०१८: ८१ वा
  • २०१९: ८२ वा
  • २०२०: ८२ वा
  • २०२१: ८१ वा

हेही वाचा >> Visa on Arrival India: भारतीयांना मिळणार परदेशात फिरण्याची संधी! व्हिसाची चिंता सोडा, लगेच तिकीट बुक करा

सर्वात शक्तीशाली पासपोर्ट कोणता? (Worlds Most Powerful Passports 2024)

तर, सिंगापूरचा पासपोर्ट सर्वात शक्तीशाली पासपोर्ट ठरला आहे. या पासपोर्टवर व्हिसा-मुक्त किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल प्रवेशाची ऑफर दिली आहे. या पासपोर्टच्या आधारे १९५ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश दिला जातो. त्यानंतर फ्रान्स, इटली, जर्मनी, स्पेन आणि जपान हे सर्व देश दुसऱ्या स्थानावर आहेत. या पासपोर्टवरही १९२ देशात व्हिसाशिवाय जाता येतं.

दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर कोण?

ऑस्ट्रिया, फिनलंड, आयर्लंड, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, दक्षिण कोरिया आणि स्वीडन हे देश १९१ देशांत व्हिसाशिवाय प्रवेश देत असल्याने हे देश तिसऱ्या स्थानावर (Worlds Most Powerful Passports 2024) पोहोचले आहेत. युनायटेड किंगडम, न्यूझीलंड, नॉर्वे, बेल्जियम, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड हे चौथ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलिया आणि पोर्तुगाल पाचव्या स्थानावर आहेत, तर युनायटेड स्टेट्स आठव्या स्थानावर घसरले आहे. या देशाच्या पासपोर्टवर १८६ देशांमध्ये व्हिसाशिवाय जाता येतं.

पाकिस्तानचा पासपोर्ट १०० व्या क्रमांकावर आहे. या पासपोर्टच्या आधारे ३३ देशांमध्ये व्हिसाशिवाय जाता येतं. तर अफगाणिस्तान एकदम शेवटच्या (Worlds Most Powerful Passports 2024) स्थानावर आहे. जवळपास दोन दशकांपासून, हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने जगभरातील २२७ देश आणि प्रदेशांमधील प्रवासाचा बारकाईने मागोवा घेतला आहे. जागतिक स्तरावर व्हिसा धोरणांमधील नवीन बदलांमुळे रिअल-टाइम अपडेट्स आणि IATA कडील विशेष डेटा वापरला जातो.

Story img Loader