फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ‘युक्रेनमध्ये आणखी वाईट काळ येणार आहे,’ असा इशारा दिलाय. मॅक्रॉन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत फोनवरुन ९० मिनिटं संवाद सादल्यानंतर ही प्रतिक्रिया दिलीय. (युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा) पुतिन यांना संपूर्ण युक्रेन ताब्यात घ्यायचा आहे असं मॅक्रॉन यांनी सांगितल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याने दिलीय.
नक्की वाचा >> Ukraine War: “मला अजिबात कल्पना नव्हती की…”; आनंद महिंद्रा लवकरच करणार मोठी घोषणा?
दिलासादायक काहीच नाही…
“राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार यापुढे भविष्यात युक्रेनसाठी अधिक वाईट काळ येणार आहे. पुतिन यांनी त्यांना जे काही सांगितलं त्यावरुन ही शक्यता व्यक्त करण्यात आलीय,” असं मॅक्रॉन यांचे सहकारी आणि फ्रान्समधील एका वरिष्ठ नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितल्याचं एएफपीच्या वृत्तात म्हटलंय. “राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आम्हाला जे सांगितलं त्यात दिलासादायक असं काहीच नव्हतं. ही मोहीम पुढे सुरु ठेवण्यासंदर्भात ते फारच खंबीर असल्याचं दिसतंय,” असं या नेत्याने म्हटलंय.
नक्की वाचा >> Ukraine War: “माझ्यासोबत बसा, आपण अगदी…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांना सुचवला ‘युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग’
डि-नाझीफाय करण्यासाठी
“पुतिन यांना संपूर्ण युक्रेन देशाचा ताबा मिळवायचा आहे असंही त्यांनी (मॅक्रॉन यांनी) सांगितलं. युक्रेनला डि-नाझीफाय करण्यासाठीची ही मोहीम आपण शेवटपर्यंत नेणार असल्याचं पुतिन यांनी स्पष्ट केलंय,” अशी माहिती या नेत्याने दिली.
शब्द देता येणार नाही, पुतिन यांनी स्पष्ट सांगितलं
मॅक्रॉन यांनी पुतिन यांना नागरिकांचे मृत्यू होणार नाही आणि मदतकार्य पोहचवता येईल यासंदर्भातील काळजी घेण्याची विनंती केली. त्यावरही पुतिन यांनी आपण असा शब्द देऊ शकत नाही असं म्हटलंय.
नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल
“राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या मताशी सहमत असल्याचं सांगितलं मात्र यासाठी काही शब्द देऊ शकत नाही, असं म्हटलंय,” अशी माहितीही या नेत्याने दिली. पुतिन यांनी युक्रेनमधील नागरी वस्त्यांवर हल्ले केले जात असल्याचा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं आहे.
पुन्हा नवीन निर्बंधांची शक्यता…
मॅक्रॉन हे पुन्हा एकदा रशियाविरोधात नवीन निर्बंधांची घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये संवादही सुरु असल्याने त्यांच्यामध्ये तणावाची परिस्थिती नाहीय असंही या नेत्याने स्पष्ट केलंय.
नक्की वाचा >> Ukraine War: रशियन उद्योजकाने दिली पुतिन यांची साडेसात कोटींची सुपारी; म्हणाला, “जिवंत किंवा मृत पकडून…”
दोन्ही देशांमध्ये तणाव नाही…
“पुतिन हे अगदी शांतपणे बोलत होते. कधी कधी ते अस्वस्थ असल्यासारखं वाटलं पण या संवादामध्ये दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव असल्याचं जाणवलं नाही,” असं या नेत्याने सांगितलं.
नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा
…त्यामुळेच युक्रेनवर हल्ला केला
युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी बोलणी करण्यास रशिया तयार आहे, मात्र युक्रेनची लष्करी आधारभूत संरचना नष्ट करण्यासाठीचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅवरॉव्ह यांनी म्हटले आहे. पाश्चिमात्य देशांनी कायम युक्रेनला शस्त्रपुरवठा केला आहे, त्याच्या फौजांना प्रशिक्षण दिले आहे आणि युक्रेनचे रूपांतर रशियाविरोधी तटबंदीत करण्यासाठी तेथे तळ बांधले आहेत, असा आरोप लॅवरॉव्ह यांनी केला. यामुळे आपल्या सुरक्षितलेला धोका निर्माण झाल्यामुळेच आपल्याला युक्रेनविरुद्ध कारवाई करणे भाग पडले, असे रशियाचे म्हणणे आहे.
नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…
२२७ नागरिक ठार
एका आठवडय़ापूर्वी सुरू झालेल्या रशियाच्या लष्करी आक्रमणात आतापर्यंत २२७ नागरिक ठार, तर ५२५ नागरिक जखमी झाले असल्याचे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे. यापूर्वी २०१४ साली रशिया समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनी फौजा यांच्यात पूर्व युक्रेनमध्ये झालेल्या लढाईत १३६ जण ठार, तर ५७७ जखमी झाले होते. त्यापेक्षा ताज्या युद्धातील नागरिकांची जीवहानी जास्त आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तांच्या कार्यालयाने सांगितले. बहुतांश मृत्यू तोफगोळय़ांचा मारा, मल्टी- लाँच अग्निबाण यंत्रणा आणि हवाई हल्ले यांसह स्फोटक शस्त्रांच्या वापरामुळे झालेले असल्याचेही या कार्यालयाचे म्हणणे आहे.